Wed, Apr 24, 2019 16:33होमपेज › Aurangabad › #Women’sDayमिलिंदनगरच्या महिलेची मुद्राच्या जाहिरातींवर छबी

#Women’sDayमिलिंदनगरच्या महिलेची मुद्राच्या जाहिरातींवर छबी

Published On: Mar 08 2018 2:06AM | Last Updated: Mar 08 2018 2:06AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

सामान्य गृहिणी म्हणून वर्षभरापूर्वी काम करीत असणार्‍या मिलिंदनगर नागसेननगर भागातील मीनाक्षी विनोद भोरगे यांनी आपल्या वस्तीतच गिरणी आणि मिरची कांडप सुरू करून उद्योजक होण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. मुद्रा योजनेअंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्रने त्यांना दिलेल्या कर्जाची गेल्या 9 महिन्यांपासून त्यांची नियमितपणे परतफेड सुरू असून, त्यांनी मिळविलेल्या यशामुळे मुद्रा योजनेच्या जाहिरातीवर त्यांची छबी झळकली आहे.

रेल्वेस्थानकाजवळ असणार्‍या मिलिंदनगर हा झोपडपट्टी असलेला परिसर. या भागातच असणार्‍या लहुजी साळवे आरोग्य केंद्रात सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळामार्फत विविध उपक्रम राबविले जातात. दहा वर्षांपूर्वी मंडळाने स्थापन केलेल्या बचतगटाशी मीनाक्षीताईंचा संपर्क आला. मंडळाच्या महिला विभागप्रमुख सविता दिवाकर कुलकर्णी यांनी त्यांना अन्नपूर्णा प्रशिक्षण वर्गाचा लाभ घेण्याचे सुचविले. या वर्गात दोन महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आपणही काही वेगळे करू शकतो, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आणि भारत युवा शक्ती ट्रस्टने त्यांची मुलाखत घेतली. दरम्यानच्या काळात अन्नपूर्णाच्या अनेक ऑर्डर्स त्यांनी पूर्ण केल्या. तसेच काही पैसे जमवून कर्जासाठी प्रयत्न सुरू केले. बीवायएसटी या संस्थेने त्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांना वसाहतीची गरज ओळखून गिरणी, कांडप सुरू करण्यास सुचविले. बँक ऑफ महाराष्ट्राने त्यांना मुद्राअंतर्गत कर्ज दिले. गेल्या वर्षभरापासून त्या या व्यवसायात व्यग्र असून, त्यांना त्यांच्या पतीची मदत मिळते. अनेक वेळा तर रात्री उशिरापर्यंत त्यांना गिरणीमध्ये काम करावे लागते.

मंडळामार्फत चालणार्‍या अन्नपूर्णा योजनेत महिलांना चाळीस प्रकारच्या रेसिपी शिकविल्या जातात. त्यामुळे या भागातील अनेक महिला खाणावळ, हॉटेल, मोठ्या केटरर्सकडे पोळ्यांची गरज भागवितात. याशिवाय स्वयंसेवी संस्थामार्फत महिलांना उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शनही केले जाते.

सहा हजारपेक्षा जास्त विवाह जुळविणारे संत सावता सुमनच्या संगीता पवार
लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात व प्रत्यक्षात त्या भूतलावर पूर्ण होतात. लग्न म्हणजे दोन जीवनाचे, दोन जीवांचे, दोन कुटुंबाचे, दोन स्वभावाचे, दोन स्नेहाचे मिलन असते. आता वधू-वर उच्च शिक्षण घेतलेले असून जात-पात या संकल्पना हळूहळू लोप पावत चालल्या आहेत. आताच्या आधुनिक व यंत्र युगात मुलगा किंवा मुलगी उच्च शिक्षित आहे का, नोकरीला आहे का, या गोष्टीकडे सर्वजण प्रामुख्याने लक्ष देतात कारण दोन्ही व्यक्ती पती-पत्नी कमावती असेल तर त्यांचा विकास वा भरभराटीत वा सुखात वा आनंदात राहु शकतो. पूर्वी लग्न जमविता वधू-वरांच्या दोन्ही कुटुंबांना खूपच अग्निदिव्यातून जावे लागत होते. 

मुली जास्त शिक्षित नसण्याच्या जेमतेम शिक्षण असले व लिहिता वाचता आले तरी पुरे व सर्व प्रकारचा स्वयंपाक तिला करता येणे अत्यंत गरजेचे व बंधनकारक होते व एकता लग्न झाले की तीचे पूर्ण आयुष्य ती मरेपर्यंत त्याच घरात जात होते. त्यामुळे मुलीला ‘चूल आणि मूल’ यापेक्षा वेगळे काय नव्हते. त्यावेळी एकत्र कुटुंब पद्धती हती व कुटुंबे ही अमर्यादित होती, परंतु आता विसाव्या शतकात सर्वांचे जीवनमान बदलून गेले. पूर्वी हम दो हमारे बारा असा नारा होता, परंतु आता ‘हम दो हमारो दो’ असा नारा आहे. शिक्षणाची जादू व 150 वर्षांपूर्वी महात्मा जोतिबा फुले व साध्वी व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अथक प्रयत्नाने मुले-मुली सुशिक्षित, उच्चशिक्षित झाल्या आहेत. त्या नोकरदार, पगारदार महिला झाल्या असून कमावत्या व कर्त्या झाल्या आहेत. 

मुलांच्या संगोपनासाठी होणारा खर्च, त्यांच्या शिक्षणावर होणारा अवाढव्य व अमाप खर्च, आजार, आरोग्य चांगले ठेवण्यासाठी घ्यावे लागणारा औषध उपचार खर्च, घरातील सणावारांवर अतिरिक्त खर्च, पाहुणचार, लग्नकार्य व समाजातील कार्यक्रमावर होणारा खर्च वाढला आहे. 

जीवनमान उंचावल्यामुळे राहणीमान टिकविण्यासाठी होणारा खर्च, हॉटेलिंग, टुरिंग, ऐषोरामावर होणारा खर्च मग तो फ्लॅट, बंगलो व पेंटहाऊस असो यासाठी दोघांना नोकरी असणे गरजेचे झाले आहे. मुलांच्या शिक्षणावर मुलींच्या शिक्षणावर, लग्नासाठी होणारा खर्च हा दिवसेंदिवस महागाईबरोबर वाढत चालला आहे, परंतु यातदेखील आपले घरपण घालवू नका, आपल्या जबाबदार्‍या पार पाडा, वयोवृद्ध आई-वडिलांची सेवा करा.