Sat, Feb 23, 2019 10:09होमपेज › Aurangabad › बनकिन्होळा परिसरातून गौण खनिजाची अवैध वाहतूक  

बनकिन्होळा परिसरातून गौण खनिजाची अवैध वाहतूक  

Published On: Dec 21 2017 1:54AM | Last Updated: Dec 21 2017 1:30AM

बुकमार्क करा

बनकिन्होळा : प्रतिनिधी 

परिसरातील गेवराई सेमी, बाभुळगाव, वरखेडी भायगाव, निल्‍लोड, चिंचखेडा, कायगाव, भवन आदी गावातीलन पाझर तलाव, नदी नाल्यातून खुलेआम मुरूम, माती वाळूची चोरटी वाहतूक सुरू असून डबराची चोरी केली जात आहे. या मुरूम डबर वाळू चोरीकडे स्थानिक पोलिस प्रशासन व महसूल विभागाचा कानाडोळा होत असल्यामुळे शासनाचा हजारो रुपयांचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहेत. या परिसरात रस्ते व सिमेंट बंधार्‍याच्या जुन्या आणि नवीन बांधकासाठी ठिकठिकाणी पायाभरण्यासाठी, रस्त्यावर टाकण्यासाठी मुरूम व डबर वाळूला मागणी असल्याने मुरूम, माती, वाळूचे उत्खनन जेसीबी, पोकलेनच्या साह्याने करून ट्रक, ट्रॅक्टर, टिप्पर, डम्पर आदी वाहनांतून राजरोसपणे चोरी करून विक्री करण्यात येत आहे.

या चोरी करणार्‍या मागे बहुतांश स्थानिक व परिसरातील राजकीय पुढार्‍यांचा वरदहस्त असल्यामुळे हा व्यवसाय जोमात सुरू आहे. त्यात काही शासकीय कामे ही राजकीय पदाधिकार्‍यांची असून चोरटी वाहतूक करणार्‍यास सर्वसामान्य नागरिक व ग्रामस्थांनी विरोध केल्यास त्यांच्यावर दबाव आणून धमक्या दिल्या जात आहे. दहशतीमुळे त्यांच्या विरोधात तक्रार करण्यास कुणी पुढे येत नाही. हे गौण खनिजाची चोरटे होणारे उत्खनन वरिष्ठानी तत्काळ थाबवावे अशी मागणी परिसरातील ग्रामस्थातून होत आहे.                    

मुरूम, वाळू, डबर, मातीची चोरटी वाहतूक करणार्‍यांकडे महसूल व पोलिस विभागाचा कानाडोळा असल्यामुळे शासनाचा हजारो रुपयांचा महसूल बुडत आहे. महसूल व पोलिस विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांची चोरटी गौण खनिजाची वाहतूक करणार्‍यावर कोणताही अकुंश व वचक नसल्यामुळे हा व्यवसाय करणारे राजकीय मंडळी असून याचे प्रशासकीय कर्मचार्‍याशी साठेलोटे असल्याने त्याचा फायद घेऊन सर्रास उत्खनन करून आपली पोळी भाजून घेत आहे.