Tue, Sep 25, 2018 14:30होमपेज › Aurangabad › वाळूची अवैध वाहतूक बोकाळली

वाळूची अवैध वाहतूक बोकाळली

Published On: Feb 12 2018 1:48AM | Last Updated: Feb 12 2018 12:56AMवाळूज : प्रतिनिधी 

महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळूजसह परिसरात विना परवानगी वाळू वाहतूक बोकाळली आहे. या वाहतुकीमुळे शेंदुरवाद्याकडे जाणार्‍या रस्त्याची वाट लागली आहे. अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांनीच वाळूजलगतच्या टोल नाक्याजवळ शनिवारी सकाळी 7 वाजेदरम्यान वाळूचा एक हायवा पकडला.

याविषयी माहीती की, वाळूज भागात आजही विनापरवाना वाळू सुरूच आहे. शनिवारी सकाळच्या वेळेला सोरमारे हे वाळूज रोडवरून जात असताना त्यांना एम एच 37 जे 972 क्रमांक हा डंपर नजरेस पडला. त्यांनी तो अडवून जप्‍त केला. या कारवाईमुळे मात्र वाळू माफिया मध्ये खळबळ निर्माण झाली असून आता सोरमारे यांनीच या भागात स्वत: लक्ष घालून तालुक्यातील वाळू माफियांचे महसूल कर्मचार्‍यांशी असलेले संबंध तसेच यासाठी टारगट तरुणांचे तयार झालेले नेटवर्क नष्ट करावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे. परिसरातील शेंदुरवादा, पिंपरखेडा, लांझी, शिवपुरसह अनेक नदी नाल्यात अवैध वाळू उत्खनन जोरात सुरू आहे. यापुर्वी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी कारवाई करूनही ही वाळू चोरी काही थांबलेली नाही. रात्रंदिवस  महामार्गावर वाहतूक सुरूच आहे. महसूल कर्मचार्‍यांसह पोलिस प्रशासनासमोरच ही वाहतूक होताना दिसते.