Wed, Sep 19, 2018 20:39होमपेज › Aurangabad › महानिरीक्षक भारंबे यांची लासूर स्टेशनला भेट  

महानिरीक्षक भारंबे यांची लासूर स्टेशनला भेट  

Published On: Feb 24 2018 5:10PM | Last Updated: Feb 24 2018 5:10PMलासुर : प्रतिनिधी

लासुर स्टेशन येथील सतत घडत असलेले  खून, चोरी, दरोड्याच्या घटनांमुळे घाबरलेल्या जनतेची आज औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे  यांना भेट घेतली. सतत होणाऱ्या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. महानिरीक्षक भारंबे या परिसराची यांनी पाहाणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मोठा फौजफाटा होता. त्यांनी नागरिकांशी चर्चाही केली.

मागील काही महिन्यांपासून चोरट्यांनी लासुर स्टेशनमध्ये धुमाकूळ घातला आहे. चोरी, दरोडा, खून, दरोड्यासाठी आल्यानंतर घरातील व्यक्तींवर हल्ला करणे अशा विविध घटना घडत आहे. यामुळे येथील नागरिक तसेच व्यवसायिकांमध्ये  भितेचे वातावरण पसरले आहे. या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. आज लासुरकरांच्या व्यथा ऐकण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी या परिसराची पाहाणी केली.

दोन खूनांच्या घटनेचा गुन्हेगाराचा पत्ता पोलिसांना लागलेला नाही. असे असतानाच चार पाच दिवसांपूर्वी  अडत व्यापारी विनोद जाजू दांमपत्यास जबर मारहाण करून पाच लाख 60 हजार रुपयांना लुबाडण्यात आले. या घटनांमुळे शहरातील व्यापारी वर्गाची झोप उडाली आहे.