Sat, Jul 20, 2019 12:55होमपेज › Aurangabad › प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

Published On: Jul 02 2018 1:42AM | Last Updated: Jul 02 2018 12:47AMकन्नड : प्रतिनिधी

तालुक्यातील चिखलठाण शिवारात 22 मे रोजी एका इसमच्या डोक्यात दगड मारून खून करण्यात आला होता. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असून पत्नीने प्रियकराच्या मतदीने हा खून घडवून आणल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी पत्नी रंजनाबाई विजय राठोड (रा. अंबातांडा, ता. कन्नड) आणि प्रियकर ज्ञानदेव नामदेव तुपे (रा. बरहाणपूर, ता.नेवासा) यांना रविवारी अटक केली. 

स्थानिक गुन्हे शाखा औरंगाबाद व कन्नड ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली असून आरोपींना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील चिकलठाण शिवारात 22 मे रोजी घुसूरतांडा येथील विजय शिवलाल राठोड (वय 32) या विवाहित युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. दुसर्‍या दिवशी ही घटना उजेडात आली होती. गोवर्धन नारायण राठोड यांनी फिर्याद दिली होती. पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात आरोपीविरोधात कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात कलम 302, 201 अन्वये गुन्हा दाखल केला होता. घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भेट देऊन तपास सुरू केला होता. मृताची पत्नी रंजनाबाई राठोड हिचा प्रियकर ज्ञानदेव तुपे याने हा खून केल्याची माहिती पोलिसांना खबर्‍याकडून मिळाली होती, मात्र खून केल्यानंतर आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेतला मात्र तो पोलिसांना चकवा देत होता. 

यानंतर आरोपी तुपे हा घोडेगाव येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी सापळा रचला आणि त्यास अटक करून कन्नड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. अटकेनंतर आरोपीने खुनाची कबुली दिली. आरोपी हा कन्नड तालुक्यातील आंबातांडा येथे तीन वर्षांपूर्वी ट्रक्टरवर कामाला होता. यावेळी त्याची आरोपी रंजनाबाई राठोड हिच्याशी ओळख झाली. यानंतर त्यांचे अनैतिक संबध प्रस्थापित झाले. मृत पती विजय हा दारू पिऊन रंजनाबाईस मारहाण करीत होता. शिवाय तिच्या प्रेमसंबंधातही तो अडसर ठरत होता. यामुळे रंजनाबाई व ज्ञानदेव यांनी त्याच्या खुनाचा कट रचला. 

सदर कारवाई पोलिस अधीक्षक आरती सिंह, अपर पोलिस अधीक्षक उज्ज्वला वनकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, उपनिरीक्षक एस. बी. कापुरे, बालू पथ्रिकर, शेख नदीम, बाबासाहेब नवले, योगेश तरमले, जीवन घोलप, रमेश सोनुने यांनी केली. पोलिसांनी दोघे आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे उपनिरीक्षक रोहीत बेंबरे यांनी सांगितले.