Mon, Sep 24, 2018 01:21होमपेज › Aurangabad › मनोरुग्णांसाठी माणुसकीची रॅली

मनोरुग्णांसाठी माणुसकीची रॅली

Published On: Jan 29 2018 1:42AM | Last Updated: Jan 29 2018 12:38AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

पुणे येथील स्माईल प्लस सोशल फाउंडेशन या सेवाभावी संस्था आणि औरंगाबाद महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 28 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता क्रांती चौक येथून माणुसकीची रॅली काढण्यात आली. रॅलीनंतर स्माईल प्लस या संस्थेच्या वतीने शहरातील बेवारस मनोरुग्णांना पुणे येथील शासकीय मनोरुग्णालयात नेऊन भरती केली जाणार आहे.  महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, मनपा आयुक्त दीपक मुगळीकर आणि संस्थेचे अध्यक्ष योगेश मालखरे यांनी दिली.

स्माईल प्लस सोशल फाउंडेशन संस्थेने शहरातील रस्त्यावर बेवारस मनोरुग्णांना शासकीय मनोरुग्णालयात नेऊन भरती करण्याचे काम केले जाते. या संस्थेचे योगेश मालखरे यांचे सामाजिक काम पाहिल्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे यांनी सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली.  

त्याकरिता 28 रोजी क्रांती चौक येथून माणुसकीची रॅली काढण्यात आली. ही रॅली रेल्वेस्टेशन, बाबा पेट्रोलपंप, बसस्थानक आणि क्रांती चौक या मार्गावर ही रॅली निघाली. या रॅलीत शहरातील बेवारस मनोरुग्णही सहभागी झाले होते. त्यानंतर या मनोरुग्णांना उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात येणार आहे. अनेक नागरिकांनी या रॅलीत सहभागी होत स्माईल प्लस सोशल फाउंडेशनच्या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले.

या संस्थेने शहरातील बेवारस मनोरुग्णांचे नुकतेच सर्वेक्षण केले. त्यात शहरात असे 40 मनोरुग्ण ठिकठिकाणी रस्त्यावर जगत असल्याचे आढळून आले. या मनोरुग्णांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर पुणे येथील शासकीय मनोरुग्ण रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत.