Mon, Nov 19, 2018 10:30होमपेज › Aurangabad › ‘औरंगाबाद दंगलीच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती’ 

‘औरंगाबाद दंगलीच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती’ 

Published On: May 23 2018 8:04AM | Last Updated: May 23 2018 8:04AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

जुन्या औरंगाबादेत  ११ आणि १२ मे रोजी झालेल्या दंगली प्रकरणी अतिरिक्त महासंचालक बिपीन बिहारी यांच्या अध्यक्षतेखाली आयपीएस अधिकाऱ्यांची उच्च स्तरीय चौकशी समिती नेमण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. 

दंगलीत नुकसान झालेल्यांना शासनाकडून नुकसान भरपाई दिली जाईल. चौकशी समितीच्या अहवालावरून दोषी पोलिस अधिकऱ्यांवर कठोर कारवाई करू आणि निरपराधांची सुटका केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादला पुढच्या तीन दिवसात नवीन पोलिस आयुक्तांची नियुक्ती होईल, असेही सांगितले. ते मुंबईत औरंगाबादच्या शिष्टमंडळाशी बोलत होते.

Tags : devendra fadnavis, urangabad riots