Tue, Mar 26, 2019 21:55होमपेज › Aurangabad › तर्राट गावाची व्यथा, आरोग्य विभाग अद्याप झिंगलेलेच

तर्राट गावाची व्यथा, आरोग्य विभाग अद्याप झिंगलेलेच

Published On: Dec 12 2017 11:10AM | Last Updated: Dec 12 2017 11:10AM

बुकमार्क करा

 
औरंगाबाद : प्रतिनिधी 

सोयगाव तालुक्यातील निमखेडी गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार्‍या विहिरीतच गावठी दारूचे ड्रम रिते करण्यात आले. हे पाणी पिऊन गावकर्‍यांना झिंग चढली. अनेकांना यातून उलट्या अन् जुलाबही झाले. विषबाधेचा धोकाही निर्माण होऊ शकला असता. मात्र, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग अजूनही गाफिलच असल्याचे दिसते.  

आठवडा लोटला तरी आरोग्य विभागाने पाण्याचे साधे नमुनेही तपासण्याची तसदी घेतली  नाही. गावाचा सर्व्हे करायलाही सहा दिवस लावले. निमखेडी गावात काही गावठी दारू  बनविणार्‍यांनी पोलिस कारवाईच्या भीतीने दारूचे ड्रम विहिरीत ओतून रिकामे केले होते. बुधवारी ही घटना घडली. याच विहिरीतून गावाला पाणीपुरवठा  होतो. हे पाणी पिऊन गावकर्‍यांना झिंग तर चढलीच, शिवाय उलटी आणि जुलाबाचाही त्रास झाला. 

गावठी  दारूमुळे विषबाधाही होण्याची शक्यता होती. मात्र, जि. प. च्या आरोग्य विभागाने या  गंभीर घटनेकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले.  गेल्या सहा दिवसांत गावातील पाण्याचे नमुने आणि नागरिकांच्या आजारांची माहिती घेण्याची तसदीही आरोग्य अधिकार्‍यांनी एवढी मोठी  गंभीर घटना घडवूनही घेतली नाही, हे विशेष. डॉ. खतगावकर यांना निमखेडीच्या   करणाबाबत विचारले असता, त्यांनी तालुका आरोग्य अधिकार्‍यांशी संपर्क केला. घटनेच्या   हा दिवसांनंतर सोमवारी गावात सर्व्हेसाठी कर्मचारी पाठवले.