Wed, Jul 17, 2019 20:06होमपेज › Aurangabad › मराठा आरक्षण; औरंगाबादमध्ये दोन आमदारांनी दिला राजीनामा

मराठा आरक्षण; औरंगाबादमध्ये दोन आमदारांनी दिला राजीनामा

Published On: Jul 25 2018 4:54PM | Last Updated: Jul 25 2018 8:12PMऔरंगाबाद: पुढारी ऑनलाईन

मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला आहे. जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे ई-मेलद्वार पाठवला राजीनामा पाठवल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. हर्षवर्धन जाधव यांच्या पाठोपाठ वैजापूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनीही राजीनामा दिला आहे. याबाबतची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच त्यांनी ठिय्या आंदोलनाची घोषणाही केली आहे. तर या दोन आमदारांबरोबरच पंचायत समिती सदस्य अनुराग शिंदे यांनी देखील आरक्षणाच्या मुद्यावरून राजीनामा दिला आहे. 

मराठा आरक्षणाचा अध्यादेश सरकारने काढावा, काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाला 50 लाखाची मदत घ्यावी यासह विविध मागण्यांसाठी जाधव यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. 24 तासात अध्यादेश न काढल्यास राजीनामा देण्याचे जाधव यांनी कालच जाहीर केले होते. त्यानुसार आज पत्रकार परिषदेत त्यानी राजीनामा दिला. 

No automatic alt text available.