Sat, Apr 20, 2019 08:34होमपेज › Aurangabad › ‘जातीत गुरफटले साहित्य’

‘जातीत गुरफटले साहित्य’

Published On: Jan 29 2018 1:42AM | Last Updated: Jan 29 2018 1:13AM औरंगाबाद : प्रतिनिधी

जातीमध्ये साहित्यिक विभागले जात असल्याची खंत ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे यांनी रविवारी येथे व्यक्त केली. 

अकराव्या गुणीजन साहित्य संमेलनाचे आयोजन शहरातील भानुदास चव्हाण सभागृहात रविवारी (दि.28) करण्यात आले होते. कादंबरीकार बाबू बिरादार यांनी अध्यक्षस्थान भूषविले. जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, कविवर्य प्रा. फ.मुं. शिंदे, अतिरिक्त विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे, डॉ. संजय नवले, पं. नाथराव नेरळकर, शशिबाला विमलकुमार, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड, प्रा.स्मिता माने, सुनीता माने, सुभाष माने आदी या वेळी उपस्थित होते.बोराडे म्हणाले की, माणसाचे जगणे, बोलणे यात सुसंगतता हवी. जी आज साहित्यात नाही. जाती, धर्म, पंथ आपल्याच गटाततटांत राहणारे आज आपल्या समाजातील साहित्यिक, लेखक, कवी असे साहित्यातही वाटून घेतले जात आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. जातीपातींच्या वेगवेगळ्या झेंड्यांचा वापर करून माणूस विभागला गेला आहे. मानवधर्म, माणुसकी तत्त्वांची आठवण करण्याची गरज आहे. अशी अपेक्षा प्रा. भांड यांनी वक्त केली. 

साहित्यिकाचे सर्वस्व म्हणजे साहित्यकृती असते. म्हणूनच साहित्यिक  त्याच्या साहित्यकृतीद्वारे स्वत:ला शाश्‍वत, चिरंजीव करतो. त्याच्या जाण्याने तो संपत नाही, तर त्याच्या साहित्यकृतीद्वारे श्‍वास घेत असतो. साहित्याचा केंद्रबिंदू माणूस असतो, असे प्रतिपादन बाबू बिरादार यांनी केले. लेखक हा कधी आपल्या अनुभवातून तर कधी वास्तवचित्रातून समाजातील प्रत्येक घटना तो टिपत असतो,  असेही त्यांनी स्पष्ट केले.