Wed, Jan 23, 2019 14:57होमपेज › Aurangabad › घराच्या जमिनीसाठी नातवाने केला आजोबाचा खून

घराच्या जमिनीसाठी नातवाने केला आजोबाचा खून

Published On: Apr 13 2018 12:49PM | Last Updated: Apr 13 2018 12:49PMआखाडा बाळापूर : प्रतिनिधी

माझ्या वडीलांच्या घराच्या वाटणीचा हिस्सा का देत नाही म्हणून २१ वर्षीय नातवाने आपल्या आजोबाच्या डोक्यात विटेने वार करून खून केल्याची घटना दि.१२रोजी रात्री साडे अकरा वाजता घडली.

शहरातील देवगल्‍ली येथे विठ्ठल सखाराम धनवे (वय ७०) हे आपल्या पत्नीसोबत स्वतःच्या घरात राहतात. तर त्यांचा मुलगा रामचंद्र हा त्यांच्या कुटुंबियासह हनुमाननगर येथे भाड्याने राहतो. त्यांना तीन मुले आहे. रामचंद्र व त्यांचे वडील यांच्यामध्ये जमिनीच्या जागेवरून वाद होते. गुरूवारी रात्री रामचंद्रचा मुलगा हा त्याच्या आजोबांच्या घरी गेला. तेथे त्याने आजोबांबरोबर जमिनीच्या विषयावरून जोरदार वाद घातला. यावेळी त्या दोघांची बाचाबाची झाली. या वादावेळी दत्ताने रस्त्यावर पडलेल्या विटेने आजोबाच्या डोक्यात व तोंडावर वार केले. यात विठ्ठल धनवे हे गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृताची पत्नी कौशल्याबाई धनवे फिर्यादीवरून नातू दत्ता रामचंद्र धनवे याच्या विरूद्ध आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सदानंद मेंडके पुढील तपास करीत आहेत.