Wed, Mar 20, 2019 23:09होमपेज › Aurangabad › मनपाच्या एनओसीत अडकले गॅस इन्सुलेटर सबस्टेशन

मनपाच्या एनओसीत अडकले गॅस इन्सुलेटर सबस्टेशन

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 16 2018 1:05AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

ऊन, वारा, पाऊस यामुळे वारंवार होणार्‍या ब्रेक डाऊनमुळे वीजपुरवठा खंडित होणे, तसेच पावसाळ्यात जमिनीत किं वा पोलमध्ये करंट उतरून होणारे अपघात टाळणे व ग्राहकांना अखंड वीजपुरवठा करता यावा, यासाठी महावितरणच्या वतीने प्रथमच गॅस इन्सुलेटर सबस्टेशन (जीआयएस) उभारणीच्या कामाला सिडको येथील समाधान कॉलनीत सुरुवात झाली आहे, परंतु भूमिगत केबल टाकण्यासाठी मनपाकडून एनओसीला उशीर लागत असल्यानेसबस्टेशनचे काम रखडले आहे. 

पारंपरिक उपकेंद्रे ही उघड्या व मोठ्या जागेवर उभी आहेत. यातील डीपीमध्ये ऑइल वापरले जाते. तसेच ब्रेकर, सीटी, पीटी इन्सुलेटर व ट्रान्सफॉर्मर असेवेगवेगळे पार्ट असतात.आता यास फाटा देत डीपीत गॅसचा वापर व ब्रेकर, सीटी, पीटी, इन्सुलेटर व ट्रान्सफॉर्मर एकाच ठिकाणी राहणार असल्याने ते जास्त सुरक्षित राहणार आहे. ही यंत्रणा एका छोट्याशा जागेत कार्यान्वित होत असल्याने जागेचीही अधिक बचत होईल, तसेच डीपीतील ऑइल चोरीला आळा बसणार आहे. उपकेंद्र उघड्या जागेवर असल्याने ब्रेक डाऊनचे प्रमाण जास्त आहे. गॅस इन्सुलेटर उपकेंद्रात ब्रेक डाऊनचे प्रमाण नगण्य राहणार आहे. त्यामुळे वीजपुरवठा अखंडित राहील आणि महावितरणला होणारा आर्थिक फटकाही टाळता येईल. 

पहिल्या वहिल्या गॅस इन्सुलेटर उपकेंद्र उभे करण्यासाठी महावितरण आटोकाट प्रयत्न करीत आहे, परंतु या सबस्टेशनमधून वीजपुरवठा करणारी केबल ही भूमिगत टाकायची असल्याने त्याला मनपाची एनओसी आवश्यक आहे. मनपाकडे अनेक दिवसांपासून प्रस्ताव पडून आहे, मात्र पक्‍का रस्ता खोदण्यास लागणारी एनओसी मनपा प्रशासनाकडून न मिळाल्यानेकाम रखडले आहे.