Sat, Apr 20, 2019 15:58होमपेज › Aurangabad › दोन शेतकर्‍यांचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न 

दोन शेतकर्‍यांचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न 

Published On: Jan 10 2018 2:26AM | Last Updated: Jan 10 2018 2:19AM

बुकमार्क करा
गंगापूर ः प्रतिनिधी 

गंगापूर सहकारी साखर कारखाना परत राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात देण्यास कडाडून विरोध करत दोन शेतकर्‍यांनी मंगळवारी अंगावर रॉकेल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पोलिसांनी त्यांच्या हातातील रॉकेलच्या बॉटल हिसकावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला. याशिवाय बँकेचे अधिकारी आणि शेतकर्‍यांतही यावेळी हमरीतुमरी झाल्याने पोलिसांनी बँक अधिकार्‍यांना पोलिस गाडीतून सुरक्षितस्थळी पोहोचविले. या घटनेने जामगाव येथील कारखाना परिसरत प्रचंड तणावाचे वातावरण पसरले होते. 

याबाबत अधिक माहिती अशी की, गंगापूर तालुक्यातील रघुनाथनगर येथील गंगापूर सहकारी साखर कारखाना राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात देण्यात यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने कारखान्याच्या संचालक मंडळाला दिले आहेत. त्यामुळे हा कारखाना ताब्यात घेण्यासाठी राज्य सहकारी बँकेचेसह व्यवस्थापक बी. एम. राठोड  व त्यांचे सहकारी कारखान्याच्या  जामगाव येथील साईटवर मंगळवारी सकाळी 11 वाजता आले होते, मात्र यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा कारखाना  आम्ही कुठल्याही परिस्थितीत राज्य सहकारी बँकेच्या परत ताब्यात देणार नाही, असा आक्रमक पवित्रा या शेतकर्‍यांनी घेतला. याचवेळी अक्षय जगन्नाथ नरोडे व सदाशिव शिरसाठ या दोन शेकर्‍यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पोलिसांनी त्यांच्या हातातील रॉकेलच्या बॉटल हिसकावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला. याशिवाय बँकेचे अधिकारी आणि शेतकर्‍यांतही यावेळी हमरीतुमरी झाल्याने पोलिसांनी बँक अधिकार्‍यांना पोलिस गाडीतून सुरक्षितस्थळी पोहोचविले. या घटनेने जामगाव येथील कारखाना परिसरत प्रचंड तणावाचे वातावरण पसरले होते.  यावेळी तालुक्यातून अनेक गावांतील शेतकरी स्वयंस्फूर्तीने आले होते. खबरदारीचा उपाय म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांझेवार, गंगापूरचे पोलिस निरीक्षक सुनील बिर्ल्ला, शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त होता. 

प्रतिक्रिया   हा कारखाना शेतकर्‍यांच्या मालकीचा आहे. त्यामुळे राज्य सहकारी बँक व इतर कोणीही राजकीय स्वार्थापोटी या कारखान्यात राजकारण करू नये. नसता शेतकरी रस्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील.   संतोष पाटील जाधव, माजी सभापती, जिल्हा परिषद  कारखाना ताब्यात घेण्याबाबत राज्य सहकारी बँकेला सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. त्यामुळे याबाबत मी सध्या तरी अधिक भाष्य करणार नाही. हा कारखाना कोणत्याही परिस्थितीत  शेतकर्‍यांच्या ताब्यात राहण्यासाठी माझ्याकडून नक्कीच प्रयत्न केले जातील. यासाठी शेतकर्‍यांनी संयम राखावा. आंदोलन शांततेत व कायदेशीर मार्गाने करावे प्रशांत बंब, आमदार.