Fri, Mar 22, 2019 05:32
    ब्रेकिंग    होमपेज › Aurangabad › पोटच्या मुलांनी नव्हे, परक्यांनीच केले अंत्यसंस्कार

पोटच्या मुलांनी नव्हे, परक्यांनीच केले अंत्यसंस्कार

Published On: Dec 14 2017 11:25AM | Last Updated: Dec 14 2017 11:25AM

बुकमार्क करा

सल्लोड : प्रतिनिधी

एका निराधार वृद्धाचे निधन झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तीनपैकी एकही मुलगा आला नाही. आपण समाजाचे काही देणे लागतो या उदात्त हेतूने औरंगाबाद येथील समाजसेवक सुमित पंडित यांनी या वृद्धाच्या अंत्यसंस्कारचा संपूर्ण खर्च करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. दुनिया मे जिसका कोई नहीं होता, उसका उपरवाला होता, अशी हिंदीमध्ये प्रचलित म्हण आहे. या म्हणीचा प्रत्येय सिल्लोड तालुक्यातील चिंचपूर येथे अनेकांना आला.

अवघ्या दोन दिवसांपूर्वीच मानवत (जि. परभणी) येथील जयराम रोकडे यांच्यासह त्यांच्या वृद्ध पत्नीस औरंगाबाद येथील समाजसेवक सुमित पंडित यांनी सिल्लोड तालुक्यातील चिंचपूर येथील वृद्ध आश्रमात दाखल केले होते. मात्र हृदयविकाराच्या झटक्याने रोकडे यांचे सोमवारी निधन झाले. आता रोकडे यांच्या अंत्यविधीकरण्यासाठी त्यांच्या तीन मुलांना कळविण्यात आले. मात्र, त्यातील एकही मुलगा समोर आला नाही. अखेर वृद्धाला अखेरचा खांदा देऊन लिंगायत समाजाच्या रितीरिवाजानुसार सुमित पंडित यांनी स्वखर्चाने त्यांच्यावर मंगळवारी दुपारी चार वाजता अंत्यविधी केला. यावेळी संतोष बोराडे (माणिकनगर),  मोहन सुरडकर, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी नारायण फाळके, डॉ. राज सूर्यवंशी, उपसरपंच देवीदास पंडित, दादाराव काळे, अशोक गायकवाड, राजेंद्र काळे, अजिंठा पोलिस ठाण्याचे सांडू जाधव, बाबूराव साबळे, समाजसेवक साहेबराव दणके, रामदास सोनवणे, नानासाहेब गायकवाड, माणिक पा. जंजाळ, संपत  जाळ, पोलिस पाटील अरुण बनकर, मृताची पत्नी पार्बताबाई जयराम रोकडे वृद्धाश्रमातील वयोवृद्ध स्त्री- पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.