Thu, Jun 27, 2019 14:06होमपेज › Aurangabad › आयटी कंपनीच्या मालकाला सायबर भामट्याने गंडवले 

आयटी कंपनीच्या मालकाला सायबर भामट्याने गंडवले 

Published On: Apr 25 2018 2:02AM | Last Updated: Apr 24 2018 11:55PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

सर्वसामान्यांना थापा मारून गंडविणार्‍या सायबर भामट्यांची मजल आता थेट आयटी कंपन्यांच्या मालकापर्यंत गेली आहे. चिकलठाणा एमआयडीसीतील आयटी पार्कमध्ये असलेल्या ग्लोबल एक्स्पर्ट या आयटी कंपनीच्या मालकाला भामट्यांनी 50 हजारांचा ऑनलाइन गंडा घातला. आयसीआयसीआय बँकेतील त्यांच्या खात्यातून ही रक्‍कम परस्पर लंपास करण्यात आली. थेट आयटी कंपनी मालकाला गंडविल्यामुळे आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे.

याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ग्लोबल एक्स्पर्ट कंपनीचे मालक मुकुंद अच्युतराव कुलकर्णी (52, रा. चेतनानगर) हे 11 व 12 एप्रिल रोजी घरी होते. कुलकर्णी यांच्याकडे आयसीआयसीआय बँकेचे डेबिट कार्ड आहे. भामट्याने त्यांच्या डेबिट कार्डचा गोपनीय क्रमांक मिळवत 11 व 12 एप्रिल रोजी पाच वेळा खात्यातून प्रत्येकी दहा हजारांची रोकड लांबवली. हा प्रकार समोर आल्यावर कुलकर्णी यांनी सोमवारी जवाहरनगर पोलिस ठाणे गाठले. त्यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून दुय्यम पोलिस निरीक्षक इंदलसिंग बहुरे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, आयटी एक्स्पर्ट, बँकेतील अधिकारी हे सायबर भामट्यांच्या कुठल्याही थापेला बळी पडत नाहीत, असे म्हटले जाते; परंतु आता भामट्याने थेट आयटी कंपनीच्या मालकाला 
टार्गेेट केल्याने आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे.

Tags :  Aurangabad, Fraud, IT, company, owner