Fri, Jul 19, 2019 20:39होमपेज › Aurangabad › सिटीचौक पोलिस ठाण्यासमोरील कपडे शिलाई दुकानाला भीषण आग 

सिटीचौक पोलिस ठाण्यासमोरील शिलाई दुकानाला भीषण आग 

Published On: Jan 31 2018 9:20AM | Last Updated: Jan 31 2018 9:20AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शहरातील सिटीचौक पोलिस ठाण्यासमोरील कपडे शिलाई दुकानाला भीषण आग लागली आहे. मनपाच्या अग्‍निशमन दलाला याची माहिती मिळताच अग्निशमनदलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. अग्‍निशमन दलाचे जवान आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्‍न करत आहेत. मात्र, दुकानात मोठ्या प्रमाणात कपडे असल्‍याने आग पसरत आहे. 

सिटीचौकी पोलिस ठाण्यासमोर तीन मजली इमारत असून, यातील पहिल्‍या मजल्‍यावर कपडे शिवण्याचे दुकाण आहे. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अचानक दुकानातून धुर येत असल्‍याचे स्‍थानिकांच्या लक्षात आले. स्‍थानिकांनी घटनेची माहिती महानगरपालिकेच्या अग्‍निशमन दलाला दिली. घटनेची माहिती मिळतातच अग्‍निशमनदलाच्या दोन गाड्या घटनास्‍थळी दाखल झाल्‍या. अग्‍निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्‍यात आणण्याचे प्रयत्‍न केले. परंतु, आग संपूर्ण दुकानात पसरल्‍याने दुकाणात असलेल्‍या कपडे शिवण्याच्या १५ मशिन आणि संपूर्ण कपडे जळाले. हे दुकान शहरातील मुख्य चौकात असल्‍याने बघ्‍यांची गर्दी झाली होती. 

दरम्‍यान, दुकानाला आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही.