Fri, Nov 16, 2018 15:18होमपेज › Aurangabad › फायर ब्रिगेडने वाचविले पाचशे कोटी

फायर ब्रिगेडने वाचविले पाचशे कोटी

Published On: Apr 10 2018 1:24AM | Last Updated: Apr 10 2018 1:06AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

अपुरे मनुष्यबळ आणि आवश्यक साधन सामुग्रीची कमतरता असतानाही मनपाच्या अग्निशमन दलातील जवानांची मदत कार्यातील कामगिरी कौतुकास्पद आहे. मागील काही वर्षांत वेळोवेळी निर्माण झालेल्या आप्तकालीन परिस्थितीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ‘फायर’च्या जवानांनी तब्बल पाचशे कोटी रुपयांची मालमत्ता आगीत भस्म होण्यापासून वाचवली आहे. यंदाच्या 2017-18 या आर्थिक वर्षात वाचविलेल्या अठ्ठावन्न कोटी रुपयांचाही यात समावेश आहे.

अचानक निर्माण झालेल्या आणीबाणीच्या परिस्थितीत धावून जाणारा म्हणून अग्निशमन विभाग परिचित आहे. काही वर्षांत शहरात निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्यासाठी धावाधाव करीत अग्निशमन विभागाने अनेक सार्वजनिक आणि खासगी मालमत्तांचे रक्षण केले आहे. 2017-18 या आर्थिक वर्षात मनपाच्या अग्निशमन विभागाने 58 कोटी 62 लाख रुपयांची मालमत्ता आगीपासून सुरक्षितपणे वाचवली आहे.  सहा वर्षांत मनपाच्या अग्निशमन दलाने आगीच्या कचाट्यातून तब्बल 504 कोटी 90 लाख 75 हजार रुपयांची मालमत्ता वाचवली आहे.अपुरे मनुष्यबळ आणि आहे त्या साधन सामग्रीच्या बळावर मनपाच्या अग्निशमन विभागाने आगीच्या अनेक घटना यशस्वीपणे हाताळल्या आहेत. वेळप्रसंगी रात्री, अपरात्री, ऊन, वारा, पाऊस न बघता फायरच्या जवावांना धाव घ्यावी लागली आहे. तरीही जीवाची पर्वा न करता उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यास फायरचे जवान यशस्वी ठरले.

Tags : Aurangabad, Fire, brigade, saved, five hundred crores