Mon, Apr 22, 2019 11:43होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : चाळीसगाव अभयरण्याच्या परिसरात वणवा पेटला

औरंगाबाद : चाळीसगाव अभयरण्याच्या परिसरात वणवा पेटला

Published On: Apr 29 2018 1:03PM | Last Updated: Apr 29 2018 1:03PMकन्नड : प्रतिनिधी 

तालुक्यातील गौताळा अभयरण्यालगत चाळीसगांव भागातील परिसरात आग लागली.वाऱ्याच्या वेगाने आग वरच्या भागात पसरल्याने मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती जळून खाक झाली.  वन्यजीव अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रयत्नने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. 

चाळीसगांवच्या खलील बाजूने लागलेली आग वाऱ्यामुळे वेगाने वर आल्याने पाटणा देवी, पितलखोरा, गोमुख, चंडिका देवी मंदिर परिसरात वणवा पेटला. ही आग विझवण्यासाठी कन्नड, नागद, लंगड़ातांडा, सातकुंड, ठाकुरवाडी येथील वनसमिती मंजूर वनपाल वन अधिकारी कर्मचारी यांनी प्रयत्न केले. मात्र उन्हाचा तड़ाखा व वाऱ्यामुळे आगी जवळ जाणे शक्य होत नव्हते. पितलखोरा परिसरात दोन्ही बाजूने दरी आसल्याने तिथे आग विझवणे शक्य होत नसल्याने तेथील झाड़े झुंड़पे जळून खाक झाली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नाकर नागापुरकर, पटवर्धन,  बी बी जराड, जी.एन.घुगे, एम.ए.शेख, शिंदे, भागवत, वाघ, बळीराम राठोड, ओंकार, रमेश घुगे प्रकाश नरवडे अदिनी प्रयत्न करून आग आटोक्यात आणून लक्ष ठेवून आहे.

गौताळा अभयरण्यात उन्हाळ्यात आग लागू नये म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणात पूर्वीच जाळरेषा घेतलेल्या असून सुध्दा वारा व वावटळ मुळे आग सर्वत्र पसरते चाळीसगांव च्या खलील बाजूने मोठ्या प्रमाणात आग लागली होती. यामुळे या परिसरात मोठे नुकसान झाले असून कन्नड नागद भागात आग पसरण्यापासून आम्ही रोखली. आजु बाजुच्या परिसरात आग लागत आसल्याने तेथील वन्यजीव मोठ्या प्रमाणात कन्नड गौताळा अभयरण्यात आले आहेत. 

धक्कादायक म्हणजे, अज्ञात लोकाकडून स्वार्थापोटी आग लावण्याचा प्रकार घडत आहे. यासाठी गौताळा अभयरण्यात सीसीटीव्ही कैमरे बसवण्यात आले आहेत.जंगलास आग लावण्याऱ्याविरुध्द वन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.तसेच गौताळा अभयरण्यात वन्यजीवांच्या जीवाला धोका निर्माण होवू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याची माहीती वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नाकर नागापुरकर यांनी दिली आहे.