Sun, Nov 17, 2019 13:09होमपेज › Aurangabad › मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करा

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करा

Published On: Jul 10 2019 2:58PM | Last Updated: Jul 10 2019 2:58PM
औरंगाबाद : प्रतिनिधी 

मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी भिंत कोसळून २१ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नऊ महिन्यांपूर्वी 21 कोटी रुपये खर्चून बांधलेली ही भिंत पडलीच कशी, त्यास कारणीभूत कोण आहे, सरकार या प्रकरणात दखल घ्यायला तयार नाही, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच 302 चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी क्रांती चौकात आयोजित करण्यात आलेल्या निषेध आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलताना ही मागणी केली. 

ते म्हणाले, 21 कोटी खर्चून बांधलेल्या या भिंतीच्या कामामध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला त्या मंत्री व अधिकाऱ्याला आतापर्यंत जेलमध्ये टाकायला पाहिजे होते, मात्र अद्यापपर्यंत कुणालाही अटक झालेली नाही,असे हे निष्काळजी सरकार या महाराष्ट्रात काम करत आहे, अशी टीकाही पवार यांनी यावेळी केली

खेकड्यावर आरोप करणारा मंत्री बिनडोक.….

तिवरे धरण फुटल्यानंतर या घटनेवर प्रतिक्रिया देताना भाजपच्या एका मंत्र्याने हे धरण खेकड्याने फोडले आहे असे विधान केले आहे. या विधानाची चिरफाड  पवार यांनी यावेळी केली,  खेकड्याने धरण फोडल्याचे सांगणाऱ्या  या भाजपच्या मंत्र्याला बिनडोकची अवलाद म्हणावे की आणखी दुसरे काय म्हणावे याने आपली अक्कल गहाण ठेवली असेल. मी ग्रामीण भागातला आहे त्यामुळे मला माहिती आहे. खेकडा फक्त अर्धा फुटापर्यंत नाळ पाडतो त्यापेक्षा जास्त नाळ पडत नाही, त्यामुळे मुक्या जनावरांवर आरोप करणाऱ्या या मंत्र्याला अटक करावी, अशा मंत्र्याने ताबडतोब आपला राजीनामा दिला पाहिजे, तसेच या सरकारनेही त्याचा राजीनामा त्वरित घेतला पाहिजे, अशी मागणी नामदेव पवार यांनी यावेळी केली.