Sat, Aug 24, 2019 00:14होमपेज › Aurangabad › शेतकर्‍यांना मदतीस लागेल दीड वर्ष : सदाभाऊ खोत

शेतकर्‍यांना मदतीस लागेल दीड वर्ष : सदाभाऊ खोत

Published On: Jun 11 2018 12:39AM | Last Updated: Jun 11 2018 12:39AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

कपाशीवरील बोंडअळीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी राज्यातील जवळपास 15 लाख शेतकर्‍यांनी ‘जी’ फॉर्म भरून दिलेला आहे. शासनाने जाहीर केलेली मदत 98 टक्के शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झाल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. मात्र, बियाणे कंपन्यांवरील कारवाईबाबत सावध पवित्रा घेत त्यांच्याविरोधात कादेशीर कारवाई केली जाईल, शेतकर्‍यांना कंपन्यांकडून मिळणार्‍या मदतीस दीड वर्ष लागू शकतात,असे ते म्हणाले.

विभागीय आयुक्‍त कार्यालयात खरीप हंगाम नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर कृषी राज्यमंत्री खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कृषी आयुक्‍त सचिंद्रप्रताप सिंह, विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, अपर विभागीय आयुक्‍त शिवानंद टाकसाळे तसेच मराठवाड्यातील महसूल आणि कृषी विभागातील अधिकार्‍यांची उपस्थिती होेती.
बोंडअळीबाबत संचालकांमार्फत अहवाल पाठवण्यात येत आहे. कापूस कायद्यानुसार कंपन्यांवर कारवाई केली जाईल. शेतकर्‍यांना मदत मिळण्यास एक ते दीड वर्ष लागू शकते, असे यावेळी सांगण्यात आले.

राज्यभरात शेतकरी पेरणी संवाद हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. निकृष्ट बियाणे आणि खतासाठी भरारी पथक स्थापन करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्याचे खोत यांनी सांगितले. यावेळी कृषी आयुक्‍त सिंह यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभासाठी कर्जदार शेतकर्‍यांनी 31 जुलै आणि बिगर कर्जदार शेतकर्‍यांनी 24 जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करावे, अशा सूचना दिल्या. विभागीय आयुक्‍त डॉ. भापकर यांनी व्हिलेज-नॉलेज आणि कॉलेज’ मोहीम कृषी आणि महसूल विभागामार्फत राबवली जाईल, असे सांगितले.