Sat, Apr 20, 2019 18:25होमपेज › Aurangabad › शेतकर्‍यांच्या आत्महत्या आज होताहेत का? : भाजप आमदार अतूल सावे

शेतकर्‍यांच्या आत्महत्या आज होताहेत का?

Published On: May 07 2018 12:38PM | Last Updated: May 07 2018 12:38PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मराठवाड्यात आणि राज्यात रोज कित्येक शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत असताना भाजपचे औरंगाबादेतील आमदार अतूल सावे यांनी मात्र या आत्महत्यांमागे वैयक्‍तिक कारणं असल्याचा अजब दावा केला आहे. एवढेच नव्हे तर शेतकर्‍यांच्या आत्महत्या या पूर्वीपासूनच होत आहेत, त्या का आज होताहेत का ? असा उलट सवालही केला. 

भाजप व्यापारी आघाडीच्या पदाधिकारी नियुक्‍तीची माहिती देण्यासाठी सोमवारी पक्षाच्यावतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत आमदार सावे यांनी वरील दावा केला. यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, कामगार मोर्चाचे संजय केणेकर, व्यापारी आघाडीचे मनोज चोपडा, नगरसेवक कचरु घोडके, नगरसेवक रामेश्‍वर भादवे, राम बुधवंत आदींची उपस्थिती होती. 

राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, त्यात जीएसटीमुळे बी बियाणे, खते महागली आहेत, अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी सरकार काय करत आहे? असा प्रश्‍न आमदार सावे यांना विचारण्यात आला. त्यावर आमदार सावे एकदम उसळले. शेतकरी आत्महत्या या काही बी बियाणे किंवा खत मिळाले नाही म्हणून होत नाहीत. जीएसटीचा त्यांच्याशी काही एक संबंध नाही. शेतकरी आत्महत्यांमागील कारणं वेगळी आणि वैयक्‍तिक स्वरुपाची आहेत. कुणी वैयक्‍तिक कर्ज घेतलेले असते. कुणाचे लग्‍नाचे प्रश्‍न असतात. त्यातून आत्महत्या होतात. दुसरीकडे गोष्ट शेतकरी आत्महत्या या काही आजच होत नाहीत. तर त्या पूर्वीपासूनच होत आल्या आहेत, असा दावाही आमदार सावे यांनी केली. 

Tags : aurangabad, atul save, farmer, farmers's suicide