Fri, Mar 22, 2019 05:34
    ब्रेकिंग    होमपेज › Aurangabad › शेतकर्‍यांनी दिला आत्मदहनाचा इशारा

शेतकर्‍यांनी दिला आत्मदहनाचा इशारा

Published On: Feb 09 2018 1:59AM | Last Updated: Feb 09 2018 1:47AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

विमातळ विस्तारीकरणासाठी संपादित केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला व साडेबारा टक्के विकसित प्लॉॅट अद्याप अनेक शेतकर्‍यांना मिळालेला नाही. याबाबत अनेकदा विनंत्या करून स्थानिक प्रशासन काहीच धोरण ठरवत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी वरील मागण्या 15 मार्चपर्यंत पूर्ण नाही केल्या तर लाभापासून वंचित असलेल्या शेतकर्‍यांनी आत्मदहनाचा इशारा जिल्हाधिकार्‍यांकडे दिलेल्या निवेदनात दिला आहे. 

औरंगाबादेतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे विस्तारीकरणासाठी चिकलठाणा, मूर्तिजापूर येथील काही शेतकर्‍यांच्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या वेळी सरकारने तुटपूंजा मोबदला देऊन या जमिनी संपादित केल्या. शेतर्‍यांनी मोबदला वाढवून व साडेबारा टक्के विकसित प्लॉट देण्याची मागणी केली होती. ही मागणी प्रशासनाने कबूल करत या सर्व सुविधा काही शेतकर्‍यांना दिल्या आहेत, परंतु याचा लाभ आजही अनेक शेतकर्‍यांना झाला नाही. उर्वरित शेतर्‍यांनाही हा लाभ मिळावा म्हणून अनेक बैठका झाल्या. 

2014 रोजी झालेल्या पालकमंत्र्यांच्या बैठकीत साडेबारा टक्के विकसित प्लॉट व इतर सवलती देण्याचा निर्णय घेतला होता, परंतु तेव्हापासून आजपयर्र्ंत या सवलती मिळाल्या नाहीत. वारंवार मागणी करूनही याकडे प्रशासन लक्ष देत नसल्याने विमातळ विस्तारीकरणात जमिनी गेलेल्या शेतकर्‍यांत संतापाची लाट पसरली आहे. 15 मार्च 2018 पर्यंत वरील सवलती न मिळाल्यास चिकलठाणा व मूर्तिजापूर येथील शेतकरी आत्महत्या करणार आहेत, असा इशारा बापूसाहेब दहिहंडे, सदाशिव पाटील, उत्तम खोतकर, शेषराव ठुबे, माधवराव ठुबे, साळुबा ठुबे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.