Wed, Aug 21, 2019 15:41होमपेज › Aurangabad › बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार?

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार?

Published On: Dec 15 2017 2:43AM | Last Updated: Dec 15 2017 12:54AM

बुकमार्क करा

सोयगाव : प्रितिनधी

मुक्‍तसंचार करणारा बिबट्या नरभक्षक झाल्याची घटना रामपूरवाडी (ता. सोयगाव) शिवारात घडली. जांभूळ नदीच्या तीरावरील घनदाट झाडीत गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास मृताचा केवळ पायच आढळला. संजय नामदेव पाटील (50, रा. कवली, ता. सोयगाव) असे मृताचे नाव आहे. हा बिबट्याचाच हल्ला असल्याचा नागररिकांचा दावा आहे. वन विभागाने मात्र त्याला दुजोरा दिलेला नाही.  

संबंंधित मृताचा मुलगा राजेंद्र पाटील याने मृतदेहाची ओळख पटवली. दरम्यान, शेतकरी संजय पाटील हे दोन दिवसांपासून घरातून शेतात जातो असे सांगून गेले होते. यानंतर त्यांचा एक पाय आढळला. दरम्यान पोलिस पाटील मूलचंद राठोड यांच्या तक्रारीवरून सोयगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृतीची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी वन विभाग आणि पोलिसांचे पथक रात्रभर ठाण मांडून आहे. रामपूरवाडी हे तीनशे लोकवस्तीचे गाव असून या घटनेमुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. बरेच जण जवळपासच्या मोठ्या गावांत स्थलांतरित झाले आहेत. तर रात्रीची वेळ असल्याने वन विभागाच्या पथकाला घटनेचे कोणतेही ठोस पुरावे संकिलत करता आलेले नाहीत. यामुळे हा बिबट्याचा हल्ला असल्याचे वन विभागाने नाकारले आहे. सोयगाव परिसरात आठवड्याभरापासून बिबट्याचा मुक्‍तसंचार सुरू असून पाळीव जनावरांवर त्याने हल्ला केला आहे. पाटील यांचा पाय पािेलसांनी विच्छेदन करण्यासाठी औरंगाबादकडे पाठविला. गावातील बालके  नदीच्या ओढ्यावर गेली असता, त्यांना मृत व्यक्‍तीचा पाय आढळला. त्यांनी ही मिाहती गावात येऊन कथन केला. यामुळेच ही घटना उजेडात आली. 

रामपूरवाडी जंगलात मृत व्यक्‍तीचा पाय आढळल्याचे कळताच पािेलसांनी घटनास्थळी धाव घेत प्राथिमक पंचनामा केला आहे. दरम्यान पोलिस पाटील मुलचंद यांनी दिलेल्या तक्रारीवरून आकिस्मक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात संबिंधत शेतकरी ठार झाला असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.               
सिुजत बडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

रामपूरवाडी घटनास्थळी वनविभागाच्या पथकाला पाठविण्यात आले आहे, परंतु रात्रीची वेळ असल्याने कोणताही पुरावा हाती आलेला नाही. त्यामुळे पुन्हा शुक्रवारी घटनास्थळी जाऊन तपास केला जाईल. 

शिवाजी काळे, वनपरिक्षेत्र इधकारी, सोयगाव


या प्रकरणाची सखोल तपासणी केली जाईल. अद्याप ही घटना वन्यजीवामुळे घडली असल्याचे स्पष्ट झालेले नाही. तसे आढळून आल्यास संबंधित शेतकर्‍यास वन विभागाकडून शासन निर्णयाप्रमाणे आथिर्र्क मदत दिली जाईल. तसेच परिसरात पिंजरे लावले जातील. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.

प्रकाश महाजन, मुख्य वनसंरक्षक, वन विभाग, प्रादेशिक