Fri, Apr 26, 2019 18:18होमपेज › Aurangabad › गांजाच्या लागवडप्रकरणी शेतकर्‍यास अटक

गांजाच्या लागवडप्रकरणी शेतकर्‍यास अटक

Published On: Dec 16 2017 2:19AM | Last Updated: Dec 16 2017 2:19AM

बुकमार्क करा

आळंद : प्रतिनिधी

गांजाची लागवड केलेल्या शेतात वडोद बाजार पोलिसांनी कारवाई करीत गांजाची झाडे व एका आरोपीस अटक केली असून दुसरा आरोपी फरार झाला आहे.

वडोद बाजार पोलिस ठाणे हद्दीत कायगाव, जिवरग टाकळी शिवारात शेतावर गांजाच्या झाडांची लागवड केल्याची माहिती खबर्‍याकडून पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांना कायगाव येथे गट नं. 124 मध्ये गांजाची लागवड केल्याचे आढळून आले. यावेळी सखाराम गयबू फुके (वय 55, रा. जिवरग टाकळी) आरोपी फरार झाला. त्याच वेळी पोलिसांना टाकळी जिवरग शिवारात गट नं. 236/183 मध्ये आरोपी गणपत गोविंदा फुके (वय 52) यांच्या शेतात गांजाची झाडे आढळून आली.

त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 17 किलो हिरवी गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलिस अधिकारी नयना आलूरकर यांच्या फिर्यादीवरून वडोद पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक आमले, सहायक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पो. कॉ. जनार्दन राठोड, पोलिस नाईक दिलीप साळवे, भोलेनाथ राठोड, पो. कॉ. तेनसिंग राठोड, गणेश सोनवणे, नितीन उणे, योगेश घुगे यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील करीत आहे.