Thu, Feb 21, 2019 15:13



होमपेज › Aurangabad › ‘प्रत्येक हिंदूने चार मुले जन्माला घालावीत’

‘प्रत्येक हिंदूने चार मुले जन्माला घालावीत’

Published On: Feb 20 2018 8:39AM | Last Updated: Feb 20 2018 8:39AM



औरंगाबाद : प्रतिनिधी

देशाच्या संरक्षणासाठी हिंदूंनी केवळ एका अपत्यावर न थांबता किमान चार मुलांना जन्म द्यावा. त्यापैकी एक राष्ट्राला समर्पित करावा, त्यास सांभाळण्याची जबाबदारी देशातील संन्याशांची राहील, असे प्रतिपादन साध्वी प्रज्ञासिंह यांनी केले.

साध्वी म्हणाल्या की, या देशाला जमिनीचा तुकडा न म्हणता भारतमाता असे संबोधतो. भारतमातेला परमवैभव मिळवून द्यायचे असेल, तर प्रत्येक हिंदूने कर्तव्याचे पालन करावे. एकच अपत्य जन्माला घालून स्वत:पुरताच विचार करणे हे राष्ट्राच्या हिताचे नाही, अन्यथा पुन्हा या देशावर परकीय आक्रमणे होतील. अधर्मीयांचे राज्य येण्यास वेळ लागणार नाही. भगव्या रंगाचे महत्त्व सांगताना साध्वी म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना भगव्या ध्वजाचाच आदर्श घेतला. डॉ. हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करताना गुरुस्थानी भगव्या झेंड्यालाच ठेवले. भगवा रंग हा पुरातन काळापासून त्यागाचे व शौर्याचे प्रतीक देणारा आहे. भारतीय संस्कृतीचा अंगभूत भाग म्हणजे अध्यात्म असून त्याचा रंगसुद्धा भगवा आहे.