Wed, Jun 26, 2019 23:48होमपेज › Aurangabad › कुशल निधी’अभावी रोपे निर्माणात अडथळा 

कुशल निधी’अभावी रोपे निर्माणात अडथळा 

Published On: Jan 18 2018 1:59AM | Last Updated: Jan 18 2018 1:50AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रताप अवचार 

शासनाच्या वतीने सन 2017-18 मध्ये 33 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, परंतु उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकांतील रोपटी निर्माणाचे काम रखडल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे रोहयोतून मिळणारा ‘कुशल’ निधीही अद्यापपर्यंत वन विभागाला न मिळाल्यामुळे रोपटी निर्माणाचे काम कासवगतीने सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शासन दरबारी विकासात्मक कितीही योजना राबविल्या तरी प्रत्यक्षात निधी न मिळाल्यामुळे वृक्षलागवड फक्‍त नावापुरतीच राहणार का असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

राज्यभरात वन विभागाच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. यामध्ये वृक्षलागवडीच्या आकडेवारीत दरवर्षी वाढ होत आहे. सन 2017-18 मध्ये 33 कोटी वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यासाठी 12 लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र वृक्षलागवडीसाठी लागणारी रोपटी निर्माण करण्याचे काम अद्यापर्यंत सुरूच झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच औरंगाबाद जिल्ह्यात सामाजिक वनीकरण व वन विभागाच्या जवळपास 30 रोपवाटिका असून यामध्ये काही रोपवाटिकाचे काम हे उसनवारी अथवा उधारीवर सुरू असल्याचे समजते. विशेष बाब कुशल निधीच्या अभावाने रोपटी निर्माणाचे काम आणखी किती दिवस रखडणार जाईल हे सुद्धा अधिकार्‍यांना माहिती नसल्याने शासनाच्या वृक्षलागवडीचे उद्दिष्ट कागदावरच राहणार यात काहीच शंका नाही.