Tue, Mar 26, 2019 23:54होमपेज › Aurangabad › दाभोलकर हत्याप्रकरणात पतीला गोवले : अंदूरेच्या पत्‍नीचा आरोप video

दाभोलकर हत्याप्रकरणात पतीला गोवले : अंदूरेच्या पत्‍नीचा आरोप video

Published On: Aug 19 2018 5:35PM | Last Updated: Aug 19 2018 6:04PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

१४ ऑगस्टला दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) माझे पती सचिन अंदूरे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. मुंबईला नेऊन त्यांनी चौकशी केली. १६ ऑगस्ट रोजी पोलिसांनी त्यांना घरी आणून सोडले. पण, त्याचवेळी पाठलाग करीत आलेल्या सीबीआय पथकाने माझ्या पतीला ताब्यात घेतले. त्यांना चौकशीसाठशी डेडलाईन असल्यानेच त्यांनी पती सचिन अंदूरे यांना डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात गोवल्याचा आरोप अणदुरेची पत्‍नी शीतल यांनी केला आहे.

शीतल पुढे म्‍हणाल्या, "चौकशीसाठी यावे लागेल म्हणून सीबीआय पुन्हा सचिन अंदूरे यांना घेऊन गेले. दरम्यान, माझा त्यांच्याशी संपर्क सुरू होता. त्यावेळीही ते काहीच अडचण येणार नाही, असे म्हणत होते. पण, डॉ. दाभोळकर हत्या प्रकरण २० ऑगस्टपूर्वी निकाली काढण्याची सीबीआयला डेडलाईन होती. त्यामुळे त्यांनी माझ्या पतीला या प्रकरणात गोवले आहे. ते निर्दोष आहेत. त्यांचा यात काहीही दोष नाही, अशी प्रतिक्रिया आरोपी सचिन अंदूरेची याची पत्नी शीतल यांनी दिली आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर त्या माहेरी गेल्या असून त्यांचे माहेर औरंगपुर्‍यात (औरंगाबाद शहर) आहे. 

दरम्यान, शनिवारी सीबीआयने सचिन अंदूरेसह इतर दोघांना डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात अटक केली आहे.