Wed, Nov 21, 2018 21:26होमपेज › Aurangabad › घरगुती गॅस रिक्षात; अड्ड्यावर छापा

घरगुती गॅस रिक्षात; अड्ड्यावर छापा

Published On: Jul 09 2018 1:33AM | Last Updated: Jul 09 2018 1:30AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

घरगुती गॅस अवैधरीत्या एलपीजी रिक्षात भरून देणार्‍या अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा मारला. एकाला रंगेहाथ पकडून पोलिसांनी गॅस सिलेंडर, दोन इलेक्ट्रिक मोटार, वजनकाटा व इतर साहित्य असा 41 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शनिवारी (दि. 7) विजयनगर, गारखेडा परिसरात ही कारवाई करण्यात आली. सय्यद कैसर सय्यद खलील हाश्मी (30, रा. गल्ली क्र. 33, इंदिरानगर, न्यू बायजीपुरा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सय्यद कैसर हा गारखेडा परिसरातील विजयनगरमधील कालिकामाता मंदिराजवळ अवैधरीत्या रिक्षात घरगुती गॅस भरून देत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार, सहायक पोलिस निरीक्षक अजबसिंग जारवाल, जमादार शिवाजी झिने, पोलिस नाईक राजेंद्र साळुंके, गजानन मांटे, सुनील धात्रक, देवचंद महेर, प्रभाकर राऊत, रवींद्र दाभाडे, विशाल सोनवणे, अन्न व वितरण विभागाचे पुरवठा निरीक्षक बबन आवले यांनी छापा मारला. यावेळी सय्यद कैसर याला रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध जमादार झिने यांच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक सय्यद सिद्दीक करत आहेत.