Wed, Jul 17, 2019 20:10होमपेज › Aurangabad › विद्यापीठात पेंटिंगचे कामे करून मिळविली पीएच.डी.

विद्यापीठात पेंटिंगचे कामे करून मिळविली पीएच.डी.

Published On: Jul 16 2018 1:24AM | Last Updated: Jul 16 2018 12:17AMऔरंगाबाद : तुकाराम शिंदे

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये विविध प्रकारची पेंटिंगची कामे केली... त्यातूनच मिळालेल्या पैशांवर आपल्या संसाराचा गाडा पुढे रेटला...याच विद्यापीठात अत्यंत जिद्दीने मेहनत घेत अभ्यास करून उच्च शिक्षण घेतले...घरात शिक्षणाची कुठलीही परंपरा नसताना देखील एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेला एक तरुण याच विद्यापीठातून पीएच.डी. पदवी घेऊन जिद्दीने परिस्थितीवर मात केली.

प्रा. डॉ. गणेश विश्‍वनाथ कंटुले असे विद्यार्थ्याचे नाव असून सध्या तो घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील मत्स्योदरी कला व विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागात 2009 पासून अध्यापनाचे कार्य करतो. घनसावंगी येथील जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ महाविद्यालयातून 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयात बी. ए.ची पदवी घेतली. त्यानंतर  सी. जे. बी. जे., एम.एम.सी.जे. मराठी विषयात एम.ए. एम. फिल. अन् आता पीएच.डी. पदवी घेऊन त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. 

विद्यापीठातील मुख्य इमारतीसमोर असणार्‍या महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्याची रंगरंगोटी असो की, विद्यापीठाच्या मुख्य कमानीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या नावाची पेेंटिंग असो. याशिवाय सर्व विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्या नेमप्लेट, वेगवेगळ्या पदवीप्रदान कार्यक्रमाचे बॅनर्स, साईज बोर्डस, कापडी बॅनर्स, वॉल पेंटिंग, डिजिटल बॅनर्स, व्यक्‍तीचित्र, निसर्गचित्र, वारली पेंटिंग, दगडी कोनशिला, रेडियम अक्षरे, दुकानाच्या पाट्या, डिझायनिंग, स्टेज डेकोरेशन असो कलाकुसरीची अनेक कामे करत गणेशने उच्च शिक्षण पूर्ण केले.