Tue, Jun 25, 2019 21:31होमपेज › Aurangabad › संत एकनाथ कारखाण्याचे संचालक मडळ बरखास्त, प्रशासकाची नियुक्ती

संत एकनाथ कारखाण्याचे संचालक मडळ बरखास्त, प्रशासकाची नियुक्ती

Published On: Apr 23 2018 5:43PM | Last Updated: Apr 23 2018 5:43PMपैठण / गौतम बनकर

संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कामकाजात अनियमितता केल्याचा ठपका ठेवत  पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असुन कारखान्यावर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश सहनिबंधक सहकारी संस्था तथा सह संचालक ( साखर ) यांनी दिले आहेत.  दोन संचालकाच्या तक्रारी वरुन ही कारवाई करण्यात आली आहे. या वृताने तालुक्यात खळबळ उडाली आहे. संत एकनाथ सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाने कारखाना नाशिक येथील शिला अतुल टेक या कंपनीला भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी दिला आहे. यावर्षी एकनाथ कारखान्याने गळीत हंगाम पुर्ण केला असुन जवळपास दोन लाख पन्नास हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. संत एकनाथच्या संचालक मंडळाने नियमबाह्य संत एकनाथ कारखाना शिला अतुल टेक या कंपनीला चालवण्यासाठी दिला व संस्थेचे आर्थिक नुकसान केले. अशी तक्रार एकनाथचे संचालक विक्रम घायाळ व कोंडीराम एरंडे यांनी सह निबंधक सहकारी संस्था. राज्य साखर आयुक्त याच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेऊन चौकशी अंती संत एकनाथ च्या संचालक मंडळावर (१) कारखाना संचालक मंडळाने संस्थेच्या हिता विरुद्ध कृत्य करणे, (२) संचालक मंडळ वैधानिक कार्य पार पाडत नाही. (३ ) संचालक मंडळाने गंभीर वित्तीय अर्थिक नियम बाह्य कामे केल्याने संस्थेचे अर्थिक नुकसान झाले आहे. (४) संचालक मंडळाने बेकायदेशीर कृत्य केल्याने संस्थेचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. (५)अनियमतता यामुळे घडलेल्या घटना अर्थिक नुकसानीच्या झाल्या असुन संस्थेची हानी झाली आहे. आदी कारणे दाखवून निलिमा गायकवाड (सहनिबंधक सहकारी संस्था तथा सहसंचालक साखर (प्रादेशिक विभाग औरंगाबाद)  यांनी कारखान्याचे संपुर्ण संचालक मंडळ बरखास्त करुन  कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. असे आदेश दि.२१ एप्रिल रोजी निर्गमित केले आहे. प्रथम विशेष लेखा परिक्षक सहकारी संस्था औरंगाबाद विलास सोनटक्के यांची एकनाथ कारखान्यावर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

बरखास्त संचालक मंडळाच्या सदस्यांमध्ये चेअरमन तुषार पा. शिसोदे, व्हा. चेअरमन भास्करराव राऊत, संचालक अप्पासाहेब पाटील, हरिभाऊ मापारी, आबासाहेब मोरे, ज्ञानेश औटे, आसाराम शिंदे, प्रल्हाद औटे, संजय वाघचौरे( माजी आमदार), गोपीकिशन गोर्डे, दत्तात्रय आमले, अक्षय शिसोदे, कचरु बोबडे, मुक्ताबाई बोरडे, अहिल्याबाई झारगड, शिवाजी घोडके, विजय गोरे, अण्णासाहेब कोल्हे, प्रकाश क्षीरसागर यांचा समावेश आहे.

 कारखान्याचे निलंबित संचालक विक्रम घायाळ व कोंडीराम एरंडे यांच्या तक्रारीवरुन राज्य साखर आयुक्त कार्यालयाने आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवत तीन महिन्यापुर्वी संत एकनाथच्या संचालक मंडळाला ९ कोटी चार लाख १० हजार रुपये दंड केला होता. सदरील प्रकरण प्रलंबित असतांना सहनिबंधक सहकारी संस्था तथा सहसंचालक(साखर प्रादेशिक विभाग औरंगाबाद) यांनी हा दुसरा दणका संचालक मंडळाला दिल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आमच्यावर विश्वास टाकुन आम्हाला कारखाना निवडणुकीत निवडुन दिले. त्यानंतर संस्था, शेतकरी व कामगार यांचे हित लक्षात घेता कारखाना चालु करणे गरजेचे होते. त्यामुळे शिला अतुल शुगर टेकच्या सहकार्याने चालु केला. यावर्षीच्या गळीत हंगामात एकनाथने चांगले साखरेचे उत्पादन घेतले. मात्र काही मंडळीने कारखाना बंद करण्यासाठी आटोकाट प्रयत्न चालविले आहे. बरखास्तीच्या आदेशाविरोधात राज्याचे सहकारमंत्री यांच्याकडे दाद मागणार आहोत. ऊसबिलापोटी शेतकऱ्यांची जी देणी बाकी आहे. ती चुकती केली जाईल.