Sun, Jul 21, 2019 10:22होमपेज › Aurangabad › केंद्रीय पथकाने साधला शेतकर्‍यांशी संवाद

केंद्रीय पथकाने साधला शेतकर्‍यांशी संवाद

Published On: May 17 2018 1:37AM | Last Updated: May 17 2018 1:19AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

बोंडअळीने मराठवाड्यात केलेल्या नुकसानीची माहिती घेण्यासाठी दोन दिवसीय पाहणी दौर्‍यावर आलेल्या केंद्रीय पथकातील अधिकार्‍यांनी बुधवारी सकाळी औरंगाबाद व फुलंब्री तालुक्यातील काही गावांना भेटी दिल्या. शेतकर्‍यांना आवश्यक असणारी लागवडीयोग्य पिके, आवश्यक तंत्रज्ञान, औषधी फवारणी, पिकांसाठी घ्यावयाची काळजी याबाबत वेळेत जनजागृती करावी, अशा सूचना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे प्रमुख तथा केंद्रीय सहसचिव अश्विनी कुमार यांनी अधिकार्‍यांना केल्या.

औरंगाबाद तालुक्यातील गाढे जळगाव, शेकटा, फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव कवाड आणि पाथरी गावाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी राज्य कृषी आयुक्‍त सचिंद्र प्रताप सिंह, विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, उपविभागीय अधिकारी मंजूषा मुथा, सोमनाथ जाधव, तहसीलदार सतीश सोनी, संगीता चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, जिल्हा कृषी विकास अधिकारी गंजेवार,  पथकातील सदस्य आर. डी. देशपांडे, के. डब्ल्यू. देशकर, चाहत सिंग, एम. जी. टेंभूर्णे, ए. मुरलीधरन, डॉ. डी. के. श्रीवासन यांची उपस्थिती होती. गाढेजळगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला. यावेळी शेतकरी जाबेर सय्यद, उपसरपंच अब्दुल रहीम पठाण यांच्यासह शेतकर्‍यांशी चर्चा केली. तसेच तुकाराम मारुती ठोंबरे यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. 

त्यानंतर शेकटा येथे दत्तात्रय जाधव, मनोज वाघ, युनूस भाई यांच्याशीही पथकाने कापूस लागवड, पेरा, बोंडअळी, वेचणी, उत्पादन, फवारणी काय केली, काय अडचणी आल्या, आदींबाबत माहिती घेतली. फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव कवाड येथील हनुमान मंदिरात भीमराव एकनाथ भोपळे, उत्तम भोपळे, भास्कर डकले यांच्यासह ग्रामस्थांशी पथकातील अधिकार्‍यांनी कापूस पीक लागवड, पीक विमा याबाबत विचारपूस केली. पाथरी येथे दत्ताभाऊ पाथरीकर, दगडू बंडू बनसोड, शिवाजी पाथरीकर, राजू तुपे, साहेबराव खाकरे, ग्रामस्थ यांच्याशी मुक्‍तसंवाद साधला. पर्‍हाटीचा वेळीच बंदोबस्त करा, त्यामुळे येणार्‍या पिकांवरदेखील परिणाम होऊ शकतो, म्हणून तत्काळ त्यांची विल्हेवाट लावा, असे आवाहन अश्‍विनी कुमार यांनी यावेळी केले. विभागीय आयुक्‍त डॉ. भापकर यांच्यासह सिंह, चौधरी यांनी येथील शेतकर्‍यांना मागेल त्याला शेततळे, तुती लागवड, ठिबक सिंचन करण्यासाठी आवाहन केले.