Sat, Feb 16, 2019 05:12होमपेज › Aurangabad › विजेच्या तारेला स्पर्श लागून १५ वर्षीय मुलाचा मृत्यु

विजेच्या तारेला स्पर्श लागून १५ वर्षीय मुलाचा मृत्यु

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिशोर (औरंगाबाद) : प्रतिनिधी

इमारतीवरील विजेच्या तारेचा स्‍पर्श होऊन १५ वर्षीच्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. २६ मार्च) रोजी सायंकाळी घडली. सुनील संजय निंभोरकर असे मृत मुलाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्मचारी संजय निंभोरकर (रा. निंभोरा, ता. कन्नड) हे आपल्या कुंटुबासोबत पिशोर येथे भाड्याच्या घरात राहतात. त्यांचा मोठा मुलगा सुनील हा अपंग होता. तो घराच्या दुसऱ्या मजल्यावर गेला होता. यावेळी त्याचा तोल गेल्याने विजेच्या तारेला स्पर्श झाला. यामध्ये तो जखमी झाला होता. यानंतर त्याला पिशोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले.

सुनीलने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. सुनील अपंग होता. त्याच्या मृत्‍यूमुळे परिसरातील नागरिक हळहळ व्‍यक्‍त करीत आहेत. या घटनेची नोंद पिशोर पोलिसात झाली आहे. 

Tags : Aurangabad, Aurangabad news, Pishor, electric shocks, boy Death,


  •