Tue, Feb 19, 2019 20:23



होमपेज › Aurangabad › दाभोलकर हत्या प्रकरण: राणा ठाकूरच्या फार्महाऊसवर तयार केले बॉम्ब

दाभोलकर हत्या प्रकरण: राणा ठाकूरच्या फार्महाऊसवर तयार केले बॉम्ब

Published On: Aug 27 2018 1:12AM | Last Updated: Aug 27 2018 1:12AM



औरंगाबाद : गणेश खेडकर

जालन्याचे माजी नगरसेवक खुशालसिंह (राणा) ठाकूर यांच्या रेवगाव शिवारातील फार्म हाऊसची दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) रविवारी झाडाझडती घेतली. याच फार्म हाऊसवर बॉम्ब बनवून पिस्तूल चालविण्याचा सराव केल्याची कबुली माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरने दिल्यानंतर ‘एटीएस’ ने हा परिसर पिंजून काढला.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेला जालन्याचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर याने चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती उघड केल्यानंतर औरंगाबादच्या दहशतवादविरोधी पथक, बॉम्बशोधक व नाशकपथक, डॉग स्न्वॉड, फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने रविवारी दुपारी पावणेचार वाजता कारवाईस सुरुवात केली. दोन टाटा सुमो, एक इनोव्हासह पाच वाहनांतून 25 ते 30 जणांचे पथक जालन्याच्या दिशेने रवाना झाले.

जालना बायपासने अंबड रोडवरील रेवगावजवळ माजी नगरसेवक राणा ठाकूर यांची 22 एकर जमीन आहे. या शेतात पाच खोल्यांचे फार्म हाऊस आहे. पाच रूमच्या फार्म हाऊसमध्ये मुक्काम करून श्रीकांत पांगारकरने बॉम्ब बनविले तसेच पिस्तूल चालविण्याचा सरावही केला. बॉम्ब बनविण्याचे साहित्य विहिरीत टाकल्याच्या संशयाने पोलिसांनी विहिरीची तपासणी केली.