Tue, Jul 23, 2019 07:25होमपेज › Aurangabad › अंदुरेच्या मित्रांच्या घरी झडती; ATSने तिघांना घेतले ताब्यात

अंदुरेच्या मित्रांच्या घरी झडती; ATSने तिघांना घेतले ताब्यात

Published On: Aug 21 2018 10:13AM | Last Updated: Aug 21 2018 10:31AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

नालासोपारा शस्त्रसाठा आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी एटीएस व सीबीआयने राज्यात धडक कारवाईला सुरुवात केली आहे. आज पहाटे सचिन अंदुरेच्या चुलत भावाच्या आणि मित्रांच्या घराची झडती घेण्यात आली. यावेळी आणखी तिघांना अटक केली असल्याचे समजते.

सचिन अंदुरेला नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी अटक केल्यानंतर त्याने दाभोलकर हत्येची कबुली दिल्याचा दावा सीबआयने केला आहे. त्यानंतर एटीएस आणि सीबीआयने औरंगाबादमध्ये आणखी तपास केला. यावेळी बीड बायपास भागात राहणाऱ्या अंदुरेच्या मित्रांच्या घरी झडती घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

वाचा : दाभोलकर हत्या प्रकरण : हल्‍लेखोरांना प्रशिक्षण कोणी व कुठे दिले?

याप्रकरणी रोहित रेगे, नचिकेत नारायण इंगळे आणि अजिंक्य शशिकांत सुरळे यांना ताब्यात घेतल्याची सातारा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या कारवाईने शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे.  यापूर्वी औरंगाबादमधील शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना नालासोपारा प्रकरणी अटक करण्यात आली आहे. 

वाचा : दाभोलकरांसह चौघांचे मारेकरी एकच