Sat, Mar 23, 2019 02:19होमपेज › Aurangabad › भूमिगत ड्रेनेजसाठी झाडांची कत्तल

भूमिगत ड्रेनेजसाठी झाडांची कत्तल

Published On: May 25 2018 1:07AM | Last Updated: May 25 2018 12:29AMऔरंगाबाद : प्रतिनिधी 

मनपा शहरात विविध भागांमध्ये पावसाळ्यात झाडे लावण्यात दंग असते. स्वच्छ शहर हरित शहर अशा पाट्या लावून जनजागृतीही केली जाते, मात्र त्याच मनपा प्रशासनाने ड्रेनेजलाइनसाठी टीव्ही सेेेंटर रोडवर असलेल्या जुन्या झाडांची गुरुवारी मोठ्या प्रमाणात कत्तल केली.  

या परिसरात मनपाची जुनी ड्रेनेजलाइन आहे. बळीराम पाटील शाळेकडून टीव्ही सेंटर, जिजाऊ चौकापर्यंत मोठी ड्रेनेज पाईपलाइन टाकण्यात आलेली आहेत. येथून आता ही भूमिगत ड्रेनेजलाइन जळगाव रोड कडे जाणार आहे. या कामात अडथळा येत असल्याने मनपाने दहा वर्षे पूर्वींच्या झाडांवर कुर्‍हाड चालविली आहे. त्यामुळे शहरातील झाडांचे हे वैभव नष्ट झाल्याने शहराचे सौंदर्यही कमी होणार आहे. अशी जुनी झाडे वाचवावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनातून होत आहे. एकीकडे झाडे लावा झाडे जगवा असा संदेश द्यायचा आणि आपणच जुन्या झाडांवर कुर्‍हाड चालवायची हा मनपाचा दुटप्पीपणाअसल्याचे बोलले जात आहे.