Mon, Dec 09, 2019 10:20



होमपेज › Aurangabad › मनपाच्या कंत्राटी तेराशे कर्मचार्‍यांना दिलासा

मनपाच्या कंत्राटी तेराशे कर्मचार्‍यांना दिलासा

Published On: Jul 01 2018 1:51AM | Last Updated: Jul 01 2018 12:42AM



औरंगाबाद : प्रतिनिधी

महानगरपालिकेला मनुष्यबळ पुरविणार्‍या तिन्ही एजन्सींच्या कंत्राटाची मुदत शनिवारी संपली. या कामासाठी पालिकेने नवीन निविदा काढणे अपेक्षित होते, परंतु ती निविदा न काढताच प्रशासनाने पुन्हा या तिन्ही एजन्सींनाच मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ पुढील निविदा प्रक्रिया होईपर्यंत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे या एजन्सींमार्फत पालिकेत काम करणार्‍या तेराशे कंत्राटी कर्मचार्‍यांना दिलासा मिळाला आहे.

सद्यःस्थितीत मनपाच्या आस्थापनेवरील सुमारे 618 पदे रिक्‍त आहेत. दुसरीकडे मागील काही वर्षात शहराची लोकसंख्या कित्येक पटींनी वाढली आहे.