Thu, Mar 21, 2019 15:25होमपेज › Aurangabad › काँग्रेसचे केंद्राविरुद्ध उपोषण

काँग्रेसचे केंद्राविरुद्ध उपोषण

Published On: Apr 10 2018 1:24AM | Last Updated: Apr 10 2018 1:04AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

देशभरात वाढते दलित अत्याचार, इंधन दरवाढ आणि निर्माण झालेला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न या सर्व मुद्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेेसतर्फे सोमवारी देशभरात लाक्षणिक उपोषण करण्यात आले. पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजघाटावरील महात्मा गांधी यांच्या स्मृतिस्थळाजवळ बसून उपोषण केले. जिल्हा काँग्रेसतर्फे सोमवारी जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार, शहराध्यक्ष नामदेव पवार यांच्या नेतृत्वाखाली शहागंजमधील गांधी पुतळ्यासमोर उपोषण करण्यात आले.

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात सोमवारी उपोषण करण्यात आले. औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीने शहागंजमध्ये उपोषण केले. सायंकाळी पाच वाजता राष्ट्रगीताने उपोषणाची सांगता झाली. उपोषणात इब्राहिम पटेल, अ‍ॅड. इकबालसिंग गिल, केशवराव तायडे, डॉ. जितेंद्र देहाडे, किरण पाटील डोणगावकर, समीर सत्तार, जितसिंग करकोटक, बाबा तायडे, आतिष पितळे, योगेश मसलगे, सुभाष देवकर, सेवादलाचे शहराध्यक्ष अल्ताफ पटेल, सुरेश पवार, सीमा थोरात, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सरोज मसलगे पाटील, संजीवनी महापुरे, सायली जमादार, ताहिरा शेख, वैशाली तायडे, भारती इंगळे, शहाना शेख यांच्यासह तालुकाध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, नगरसेवक, विविध सेलचे अध्यक्ष आदींसह पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

Tags : Aurangabad, Congress, Fasting, against,  Center