Fri, Mar 22, 2019 07:43होमपेज › Aurangabad › हिंसाचारात जमावाने दुकाने पेटवली, दिव्यांग व्यक्तीचा होरपळून मृत्यू

औरंगाबाद हिंसाचार : दिव्यांग व्यक्तीचा होरपळून मृत्यू

Published On: May 12 2018 11:06AM | Last Updated: May 12 2018 3:56PMऔरंगाबाद : पुढारी ऑनलाईन

शहरात शुक्रवारी रात्रीपासून उसळलेल्या हिंसाचारात एकाचा जळून तर एकाचा गोळीबारात मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यापैकी एक व्यक्ती दिव्यांग आहे. ही व्यक्ती दुकानात झोपली होती. रात्री जमावाने आग लावल्यानंतर दिव्यांग असल्यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही आणि त्यांचा होरपळून मृत्यू झाला.  

वाचा : औरंगाबाद: अनधिकृत नळावरून शहर पेटले, दोघांचा मृत्यू; संचारबंदी लागू! (Video)

शहरात शुक्रवारी रात्री सुरु झालेल्या हिंसाचारात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. यात अब्दुल हरीश अब्दुल हारुन कादरी हा 17 वर्षाचा युवक जखमी झाला होता. त्याच्यावर ‘एमजीएम’मध्ये उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या व्यक्तीचा मृत्यू  शहागंज झाला. जगनलाल बन्सीले (वय 62, रा. स्टेट बँकेजवल, शहागंज) दुकानात झोपलेल्या दिव्यांग व्यक्तीचा जाळपोळीत मृत्यू झाला. ते शहागंज परिसरातील एका दुकानात शुक्रवारी रात्री झोपले होते. रात्री उसळलेल्या दंगलीनंतर शनिवारी पहाटे अज्ञात व्यक्तींनी या दुकानाला आग लावली. यानंतर दुकानाला आगीने वेढले. यामुळे जगनलाल यांना जाग आली. मात्र ते दिव्यांग असल्याने आगीतून बाहेर पडू शकले नाहीत. यातच त्यांचा होरपळून मृत्यू झाला, असे सिटीचौक पोलिसानी सांगितले. दरम्यान, रात्रीपासून सुरू असलेल्या दंगलीत 32 जखमी घाटीत दाखल झाले.

वाचा : औरंगाबाद : ‘तुम्ही आमचे नळ कनेक्शन तोडले, त्यांचेही तोडा’(फोटो) 

मृतदेह स्वीकारण्यास नकार

शुक्रवारी रात्री झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अब्दुल हरीश अब्दुल हारुन कादरी जखमी झाला होता. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जोपर्यंत शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आणि पक्षाच्या शहर अध्यक्षांच्यावर 302 कलमानुसार गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत मृतदेह घेणार नसल्याचे कादरीच्या कुटुंबियांनी सांगितले.