Tue, May 21, 2019 19:02होमपेज › Aurangabad › चिकलठाणा येथे स्वच्छता निरीक्षकाला मारहाण, 

चिकलठाणा येथे स्वच्छता निरीक्षकाला मारहाण, 

Published On: Jun 28 2018 1:32AM | Last Updated: Jun 28 2018 1:27AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

पावसामुळे प्रचंड दुर्गंधी सुटल्याने शहरातील कचराप्रश्न बुधवारी पुन्हा पेटला. चिकलठाणा येथे कचरा टाकण्यासाठी विरोध करीत एका नागरिकाने बुधवारी (दि. 27) सकाळी आठ वाजता मनपाचे स्वच्छता निरीक्षक प्रकाश आठवले यांना बेल्टने मारहाण केली.किराडपुरा भागातील कचर्‍यासह इतर समस्या सोडविण्याकडे मनपा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त नागरिकांनी वॉर्ड कार्यालयाला कुलूप ठोकले.

चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून शहराची चहुबाजूंनी कचराकोंडी झालेली आहे. अद्यापही शहरातील रस्त्यांवर आणि नियोजित प्रक्रिया केंद्रावरही शेकडो मेट्रिक टन कचरा सडत आहे. पावसामुळे या कचर्‍यातून प्रचंड दुर्गंधी सुटल्याने रोगराईचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आता नागरिकांमध्ये मनपा प्रशासनाविरुद्ध असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.

बुधवारी सकाळी चिकलठाणा येथील कंपोस्ट पीटवर ओला कचरा टाकण्यासाठी गेलेली ऑटोरिक्षा परिसरातील अर्जुन बकाल या नागरिकाने अडविली. मनपा कुठलीही प्रक्रिया    न करता या ठिकाणी कचरा आणून टाकत आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे आता कचरा टाकू देणार नाही, पुन्हा इकडे येऊ नका, असे सांगत त्याने कचरा टाकण्यास विरोध केला. मनपाचा रिक्षाचालक मनोज शिरसाट यास शिवीगाळ केली. कचरा टाकू दिला जात नसल्याने जवान भाऊसाहेब याने दूरध्वनीवरून कळविताच मनपाचे स्वच्छता निरीक्षक प्रकाश आठवले त्या ठिकाणी पोहचले. त्यांनाही बकाल याने बेल्टने मारहाण केली.