Sat, Jul 20, 2019 08:35होमपेज › Aurangabad › छिंदम विरोधात शिवप्रेमी झाले आक्रमक

छिंदम विरोधात शिवप्रेमी झाले आक्रमक

Published On: Feb 18 2018 1:55AM | Last Updated: Feb 17 2018 11:10PMवसमत : प्रतिनिधी

अहमदनगर महानगर पालिकेचे उपमहापौर श्रीपाद छिंदम याने शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्याचे वसमत शहरात पडसाद उमटले. या विरोधात शनिवारी दि. 17 फेब्रुवारी रोजी शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी छिंदमच्या प्रतिमेला जोडे मारो व अर्धनग्न आंदोलन केले.

दरम्यान, या वक्तव्याचे अहमदनगरसह मराठवाड्यातही पडसाद उमटले आहेत. योवळी छिंदमच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला आहे. तसेच शिवप्रेमींच्या वतीने वसमत शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यावर मोर्चाही काढला. छिंदम यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या प्रमुख मागणीसाठी शिवप्रेमींनी पोलिस ठाण्यातच ठिय्या दिला. याप्रसंगी ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांना निवेदन देण्यात आले. वसमत तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची मोठ्या संख्येेने उपस्थिती होती.

जवळाबाजार : प्रतिनिधी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदमने छ.शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. त्यामुळे शिवप्रेमींसह हिंदू धर्माच्या तीव्र भावना दुखावल्या. अशा व्यक्तीवर कठोरात कठोर कार्यवाही करण्याची मागणी शिवसेना जि.प.सदस्य जिवनलता परिहार यांनी जवळाबाजार पोलिस ठाण्यातील जमादाराकडे  निवेदनाद्वारे केली. निवेदनावर  नितेश परिहार, गजानन मुळे, मंचक मुळे, चंद्रकांत शिंदे, संतोष शेळके, गणेश घुगे, बन्सीधर क्षीरसागर, मधुकर अंभोरे, बाळु सापतकर, मधुकर कदम आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

आखाडा बाळापूर : प्रतिनिधी

अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम याने दोन दिवसावर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आलेली असताना छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवजयंती विषयी अवमानकारक व्यक्तव्य करून तमाम मराठी बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे छिंदमला तात्काळ अटक करावी अन्यथा सर्व समाज बांधवातर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आखाडा बाळापूर पोलिस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनावर दत्ता बाेंंढारे, श्रीकांत वाघमारे, केशव मुळे, अवि सावंत, सचिन मिराशे, ऋषिकेश बोंढारे, विठ्ठल वानखेडे, नामा बोंढारे, नागेश बोंढारे, नागेश बोंढारे, प्रदीप हरण, अभय कडगे, प्रमोद बयास, सागर बोेंढारे, ज्ञानेश्‍वर बोंढारे, श्याम कळमुळकर, कपिल अंभोरे, अमोल बोंढारे, रजत पांचाळ, राहुल पवार, सोमनाथ लासे, शुभम लासोरे, गोविंद बोंढारे, शंतनु सेवनकर आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.