Fri, Apr 26, 2019 15:23होमपेज › Aurangabad › महाराष्ट्रावर कोसळू शकते चीनची प्रयोगशाळा!

महाराष्ट्रावर कोसळू शकते चीनची प्रयोगशाळा!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

सावधान! चीनने अंतराळात पाठविलेली टायोगोंग-1 ही प्रयोगशाळा पृथ्वीच्या दिशेने वेगाने येत असून, ती एक एप्रिलच्या पहाटे पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता आहे. खगोल शास्त्रज्ञांनी या प्रयोगशाळेची कक्षा अभ्यासून औरंगाबाद, जालना, देऊळगाव राजासह राज्यातील अनेक ठिकाणी या प्रयोगशाळेचे तुकडे पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. एमजीएम अंतराळ संशोधन केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी या शक्यतेला दुजोरा दिला आहे.

चीनची पहिली अंतराळ प्रयोगशाळा टायोगोंग-1 पृथ्वीच्या वातावणात शिरण्याच्या स्थितीत असून 1 एप्रिल रोजी  भारतीय वेळेनुसार पहाटे 1 वाजेपासून सायंकाळी 7 पर्यंत ती कधीही पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता अमेरिकेतील एरोस्पेस कॉर्पोरेशनने व्यक्‍त केली आहे. या प्रयोगशाळेच्या कक्षेत महाराष्ट्रातील अनेक ठिकाणे असून यात शेवगाव, पैठण, जालना, देऊळगावराजा, अमडापूर, अकोला, बाळापूर, परतवाडा, करंजगाव आदींचा समावेश आहे. 

जगभरातील अवकाश संशोधन संस्था या घटनेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.  30 मार्चला अमेरिकेतील एरोस्पेस कॉर्पोरेशनने ही प्रयोगशाळा कोसळण्याची वेळ निश्‍चित केली असून याला युुरोपियन स्पेस एजन्सीनेही दुजोरा दिला आहे. टायोगोंग-1 पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यापासून संपूर्ण जळून खाक होईपर्यंत साधारण 2000 कि.मी. अंतर पार करेल व त्याचे तुकडे सुमारे 70 कि.मी. रुंदीच्या पट्ट्यात विखुरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आकाशात उल्कावर्षाव दिसेल, अशी माहितीही औंधकर यांनी दिली.

Tags : Aurangabad, Aurngabad news, China, laboratory, fall, Maharashtra


  •