Thu, Jun 27, 2019 04:25होमपेज › Aurangabad › शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत बदल

शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत बदल

Published On: Feb 17 2018 2:05AM | Last Updated: Feb 17 2018 12:43AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध ठिकाणांहून मिरवणुका काढण्यात येणार असून सकाळी 11 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत या मिरवणुका सुरू राहतील. यादरम्यान नागरिकांना अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आला. संस्थान गणपती, क्रांती चौक, टी.व्ही. सेंटर, सिडको, हडको व गजानन महाराज मंदिर या ठिकाणाहून मिरवणुका काढण्यात येणार आहेत. वाहतुकीत केलेला बदल हा बंदोबस्तावरील वाहने, अग्निशामक दल, रुग्णवाहिका, आरोग्यसेवा, दंडाधिकारी, अत्याश्यक सेवा यांच्या वाहनास लागू राहणार नाही, असे सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक) चंपालाल शेवगण यांनी कळविले.

हे मार्ग राहतील बंद...
1) राजाबाजार चौक, संस्थान गणपती, शहागंज, गांधीनगर, सराफा, सिटी चौक, गुलमंडी, बारभाई ताजिया-पैठणगेट, सिल्लेखाना चौक, क्रांती चौक ते भडकलगेट. 
2) एन-12 नर्सरी सिडको, टी.व्ही. सेंटर चौक, जिजामाता चौक, एम-2, एन-9, शिवनेरी कॉलनी, पार्श्‍वनाथ चौक, बळीराम पाटील चौक, ओंकार चौक, बजरंग चौक, आविष्कार चौक, शिवाजी महाराज पुतळा, चिश्तिया कॉलनी चौक.
3) जयभवानीनगर चौक ते गजानन महाराज मंदिर, सेव्हनहिल उड्डाणपूल ते जवाहरनगर पोलिस ठाण्यासमोरील चौक हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे.

या पर्यायी मार्गाचा करा वापर...
शहागंजकडून सिटी चौकाकडे येणार्‍या वाहनचालकांनी चेलीपुरा चौक, लोटा कारंजा-कामाक्षी लॉजमार्गे यावे.
क्रांती चौक, गुलमंडी-सिटी चौककडे जाणार्‍या वाहनांनी सावरकर चौक-कार्तिकी हॉटेल- मिलकॉर्नर- भडकलगेट मार्ग वापरावा.
मिल कॉर्नरकडून औरंगपुर्‍याकडे जाणारी सर्व वाहने अंजली टॉकीजजवळून उजवीकडे नागेश्‍वरवाडी-डॉ. खनाळे हॉस्पिटल-निराला बाजार-समर्थनगरमार्गे किंवा अंजली टॉकीजपासून डावीकडे खडकेश्‍वर-मनपामार्गे जातील.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टी.व्ही. सेंटरकडे जाणार्‍या वाहनांनी अण्णा भाऊ साठे चौक-उद्धवराव पाटील चौक-सिद्धार्थ चौक या मार्गाचा वापर करावा.
जयभवानीनगर चौकाकडून गजानन महाराज मंदिराकडे जाण्यासाठी सिडको चौक-सेव्हन हिल उड्डाणपूल हा मार्ग निवडावा.
जवाहरनगर ठाण्याकडून सेव्हन हिल उड्डाणपुलाकडे जाण्यासाठी माणिक हॉस्पिटल-रोपळेकर चौक-अमरप्रीत चौक-आकाशवाणी चौकमार्गे जावे.
त्रिमूर्ती चौकाकडून गजानन महाराज मंदिराकडे येणारी वाहने हेडगेवार हॉस्पिटलच्या पाठीमागून माणिक हॉस्पिटल-जवाहरनगर ठाणेमार्गे जातील.