Thu, Jun 27, 2019 01:32होमपेज › Aurangabad › संविधान वाचवणे हे देशापुढे आव्हान : कन्हैयाकुमार

संविधान वाचवणे हे देशापुढे आव्हान : कन्हैयाकुमार

Published On: Aug 27 2018 1:12AM | Last Updated: Aug 27 2018 1:00AMऔरंगाबाद : प्रतिनिधी
ज्या संविधानावर देश उभा आहे ते संविधान दिल्लीमध्ये राजरोसपणे जाळले जाते; मात्र सरकार काहीही कारवाई करत नाही, हे गंभीर आहे. संविधान वाचवणे हे आज देशापुढे आव्हान आहे, असे प्रतिपादन जेएनयू विद्यापीठाचे विद्यार्थी नेते कन्हैयाकुमार यांनी केले. ते दिल्लीला जाण्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी जालना रोडवरील हॉटेलमध्ये थांबले होते. 
कन्हैयाकुमार मराठवाड्याच्या दौर्‍यावर आले होते. ते परत दिल्लीला जाताना त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, भाजप पुन्हा सत्तेत आले तर मुख्य प्रश्‍न बाजूला पडतील आणि हिंदू-मुस्लिम दंगे वाढतील. जातीपातीचे राजकारण वाढेल, म्हणून संविधानाला मानणार्‍या वर्गाने एकत्र आले तर भाजपला हरवणे कठीण नाही, भाजपला केवळ 31 टक्के लोकांनी मत दिलेले आहे. याचा विचार करूनच समविचारी पक्षांनी 2019 च्या निवडणुकीत उतरले तर विजय निश्‍चित असल्याचा विश्‍वासही कन्हैयाकुमार यांनी व्यक्त केला.  भाजप सरकार हिंदू आणि हिंदुत्ववादी यांची सरमिसळ करून दिशाभूल करून हिंदू धर्माचा राजकारणात वापर करून घेत आहे, असाही आरोप यावेळी कन्हैयाकुमार यांनी केला. यावेळी डॉ. भालचंद्र कानगो, प्रा. राम बाहेती, अभय टकसाळ, जयमलसिंग रंधवा, अश्फाक सलामी, माधुरी जमधडे, मधुकर खिल्लारे, अ‍ॅड. अय्याज शेख, विकास गायकवाड यांची उपस्थिती होती.