Fri, Jul 19, 2019 22:23होमपेज › Aurangabad › आयुक्‍त कार्यालयात पुन्हा खुर्च्या

आयुक्‍त कार्यालयात पुन्हा खुर्च्या

Published On: May 25 2018 1:07AM | Last Updated: May 25 2018 12:27AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मनपा आयुक्‍तांनी आपल्या कार्यालयातील प्रतीक्षा कक्षामध्ये अभ्यागतांसाठी असलेल्या खुर्च्या काही दिवसांपूर्वीच काढल्या होत्या. त्यामुळे नागरिकांना इथे उभे राहूनच प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र, यावर टीका झाल्यानंतर आता आयुक्‍तांनी प्रतीक्षा कक्षात पुन्हा खुर्च्या ठेवायला लावल्या आहेत. त्यामुळे आता नागरिकांना उभे राहण्याची शिक्षा सहन करावी लागणार नाही. शहरातील शेकडो नागरिक कामानिमित्त रोज मनपा आयुक्‍तांच्या भेटीसाठी येत असतात. नागरिक आत चिठ्ठी पाठवून प्रतीक्षा कक्षात वाट पाहतात, परंतु नवे आयुक्‍त डॉ. निपुण विनायक यांनी ही पद्धत बंद केली. त्यांनी प्रतीक्षा कक्षातील सर्व खुर्च्या काढून टाकायला लावल्या. त्यामुळे नागरिकांना मागील काही दिवसांपासून उभे राहूनच प्रतीक्षा करावी लागत होती. त्याबद्दल अनेक नारिकांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली होती. तसेच वर्तमानपत्रांतूनही त्यावर टीका झाली. त्यानंतर आता मनपा आयुक्‍तांनी प्रतीक्षा कक्षात पुन्हा खुर्च्या ठेवायला लावल्या आहेत. 

प्रवेश मात्र मागील दारानेच : प्रतीक्षा कक्षातील खुर्च्या काढण्याबरोबरच आयुक्‍तांनी त्यांच्या दालनात नागरिकांना समोरच्या दाराने प्रवेश करणेदेखील बंद केले होते. समोरच्या दालनाऐवजी मागील दाराने प्रवेश देण्यात येत आहे. यामध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे अजूनही तिथे मागील दारानेच आयुक्‍त दालनात प्रवेश दिला जात आहे.