Wed, Mar 27, 2019 04:33होमपेज › Aurangabad › दुसर्‍यांचे भूखंड परस्पर विक्री केल्याचे प्रकरण

दुसर्‍यांचे भूखंड परस्पर विक्री केल्याचे प्रकरण

Published On: Dec 22 2017 1:25AM | Last Updated: Dec 22 2017 1:19AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

बनावट कागदपत्रांच्या आधारे दुसर्‍याचा भूखंड परस्पर विक्री करून तिघांनी एका फळविक्रेत्याची साडेतेरा लाखांना फसवणूक केली. ही घटना 29 मे 2015 रोजी घडली. याप्रकरणी फळ विक्रेता सय्यद लाल सय्यद हबीब (47, रा. सावंगी हर्सूल) यांच्या तक्रारीवरून शेख मुजीब शेख सुभान (रा. सादातनगर), शेख मुश्ताक शेख मुनाफ (रा. रहेमानिया कॉलनी) आणि शेख साहेबलाल शेख हसन (रा. बाबर कॉलनी) या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला.

याबाबत तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक शेख सरवर यांनी सांगितले की, सय्यद लाल हे जाधवमंडईत फळ विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांची काही वर्षांपासून आरोपी शेख साहेबलाल याच्याशी ओळख झाली. त्याने जटवाडा रोडवरील भूखंडाबाबत लाल यांना माहिती दिली. त्यानंतर आरोपी शेख मुजीब आणि शेख मुश्ताक या दोघांची ओळख करून दिली. त्यानंतर सर्वांनी प्लॉट खरेदीबाबत गळ घातली. विशेष म्हणजे, दुसर्‍यांच्या प्लॉटची बनावट कागदपत्रांद्वारे नोटरी करून दिली. यात त्यांचा साडेतेरा लाख रुपयांचा व्यवहार झाला. आता या प्लॉटवर दुसर्‍याच व्यक्‍तीने दावा केल्याने फसवणुकीचा प्रकार समोर आला.