Tue, Oct 15, 2019 07:58होमपेज › Aurangabad › सवेरा कंपनीच्या कर्मचार्‍याविरोधात खंडणीचा गुन्हा 

सवेरा कंपनीच्या कर्मचार्‍याविरोधात खंडणीचा गुन्हा 

Published On: Mar 02 2018 12:40PM | Last Updated: Mar 02 2018 12:40PMऔरंगाबाद : प्रतिनिधी 

औरंगाबाद- नगर रस्त्यावरील छावणी टोलनाक्यावर वाहनाधारकांची लूट होत असल्याच्या तक्रार दाखर करण्यात आली आहे. याप्रकरणी सवेरा कंपनीच्या तीन कर्मचार्‍यांवर छावणी पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.   फिर्यादी विनीत गिरधारीलाल जग्गी यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. गुरुवारी नेहमीप्रमाणे टोल नाक्यावरुन जात असताना त्यांच्याकडून  टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी अधिक रक्कम वसूल केल्याचे त्यांनी म्हटले आहे.  

टोल नाक्यावरुन खाली वाहनासाठी नियमाप्रमाणे ६० रुपये आकारणी केली जाते. मात्र, त्यांच्याकडून ६० रुपयाच्या तीन पावत्या देऊन १८० रुपये आकारले. याविषयी त्यांनी जाब विचारला असता कर्मचार्‍यांनी जग्गी यांना दमदाटी करून धमकी दिली. यासंदर्भात छावणी पोलिस स्टेशनमध्ये तीन अनोळखी कर्मचार्‍यांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर सवेरा कंपनी ही भाजपा आमदार अतुल सावे यांची आहे.