Sat, Feb 23, 2019 16:16



होमपेज › Aurangabad › औरंगाबादमध्ये कार झाडाला धडकून दोन डॉक्‍टर ठार

औरंगाबादमध्ये कार झाडाला धडकून दोन डॉक्‍टर ठार

Published On: Feb 20 2018 9:25AM | Last Updated: Feb 20 2018 9:25AM



औरंगाबाद : प्रतिनिधी

स्विफ्ट कार झाडाला धडकून झालेल्‍या अपघातात  दोन डॉक्टर ठार झाल्‍याची घटना घडली. तिसरे डॉक्टर गंभीर जखमी झाले. ही घटना औरंगाबादमधील रामनगर कमानीजवळ पहाटे अडीच ते तीन च्या दरम्यान घडली. गोविंदकुमार सतनामसिंग (वय 25, रा. मूळ हरियाणा) लक्ष्मीकांत दगडीया (वय 25, रा. रामनगर) अशी मृत डॉक्टरांची नावे आहेत. तर कारमधील अरविंद पवार (रा. म्हाडा कॉलनी) हे डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत.

तीन डॉक्‍टर पहाटे कारने जाताना रामनगर येथील कमानीजवळ त्यांची कार एका झाडाला धडकली. धडक एवढी जोरात होती की गोविंदकुमार व लक्ष्मीकांत हे ठार झालेत. या घटनेनंतर मुकुंदवाडी ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संजय बनसोड, पोलिस शिपाई मुंढे, ढवळे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात नोंद झाली. अरविंद पवार अपेक्स हॉस्पिटल येथे प्रॅक्टिस करतात; मृत गोविंदकुमार आणि लक्ष्मीकांत सावंगीकर रूग्णालयात प्रॅक्टिस करीत होते अशी माहिती मुकुंदवाडी पोलिसांनी दिली.