Mon, Jul 22, 2019 01:11होमपेज › Aurangabad › 'तो' चोरी करतो आणि पोलिस पकडण्यास टाळाटाळ करतात!

'तो' चोरी करतो आणि पोलिस पकडण्यास टाळाटाळ करतात!

Published On: Apr 16 2018 10:09AM | Last Updated: Apr 16 2018 10:09AMजामखेड : प्रतिनिधी

अंबड तालुक्यातील जामखेड येथील एका पंचवीस वर्षीय तरुणास क्षयरोगाने ग्रासले आहे. हा तरुण  आजाराचे भांडवल करीत दुकाने फोडतो तसेच दुचाकीही चोरी करतो, मात्र या तरुणाला झालेल्या  दुर्धर  आजारामुळे पोलिसही त्यास पकडण्यास टाळाटाळ करीत असून त्यामुळे त्याच्यासाठी आजार वरदान ठरत आहे. जामखेड येथील दोन दुकाने फोडण्याच्या घटना काही दिवसांपूर्वी घडल्या. या चोरीत  चाळीस हजार रुपये चोरून नेण्यात आले.

याबाबत तक्रार करण्यात आली, मात्र पोलिस  त्या युवकाच्या आजाराचे कारण सांगून त्यास पकडण्यास टाळाटाळ करीत आहेत. आजारपणातही या तरुणाचे  चोर्यकर्म नित्यनेमाने सुरू असते. प्राथमिक आरोग्य केंद्रातील  डॉक्टर या तरुणाच्या घरी जाऊन त्याच्यावर औषधोपचार करतात, मात्र डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या व औषध तरुण घेत नाही. या तरुणाचा परिवार त्याच्या चोर्‍यांना कंटाळला आहे.

काही दिवसांपूर्वी त्याने आपल्याच कुटुंबीयांच्या पाण्यात विष मिसळले होते, मात्र घरातील लोकांच्या ते वेळीच लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. शेजारी राहणार्‍यांचे घर त्याने काही  दिवसांपूर्वी पेटवून दिले होते.

या तरुणास क्षयरोग आहे. त्याला पुणे येथे नेण्यात आल्यास तो बरा होऊ  शकतो. आमच्याकडील गोळ्यांचा डोस चालूच आहे, पण या गोळ्या त्याने वेळेवर घेणे गरजेचे आहे. ए. बिरादार, वैद्यकीय  अधिकारी, जामखेड 

Tags : Cancer, Petant, Aurangabad, Theft