Thu, Nov 22, 2018 00:01होमपेज › Aurangabad › डिझेल भरतानाच आगीचा भडका

डिझेल भरतानाच आगीचा भडका

Published On: Apr 10 2018 1:21AM | Last Updated: Apr 10 2018 1:21AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मुख्य बसस्थानकातील डिझेल पंपावर बसमध्ये डिझेल भरताना सोमवारी (दि. 9) अचानक स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. वेळीच त्या बसचालकाने डिझेल भरण्याचे नोझल बाजूला सारून गाडी धक्का मारून बाजूला ढकलली. ही घटना दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली. यात पंपचालक किरकोळ भाजला असून त्याला उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले आहे. 

मुख्य बसस्थानकात सोमवारी (दि. 9) दुपारी 3 वाजता एशियाड बस (एम एच 20 बी एल 3188) डिझेल भरण्यासाठी बसस्थानक  परिसरात असलेल्या पंपावर आली. डिझेल ऑपरेटर करीम हे डिझेल भरत असताना अचानक स्फोट होऊन बसच्या डिझेल टँकमधून आगीचे लोळ बाहेर आले. करीमच्या अंगावर अचानक आगीचे लोळ आल्याने तो भाजला आणि बाजूला जाऊन पडला. त्यावेळी डिझेलची नळी बसच्या टँकमध्येच होती. प्रसंगावधान साधून या बसचे चालक सिद्धार्थ खंदारे  यांनी प्रथम डिझेल पाईप टाकीच्या बाहेर फेकून ती आग माती टाकून विझवली. घटना समजताच कृष्णा मुंजाळ, तेथील सुरक्षा रक्षक नागेश मोटे आणि अशोक साळवे, अशोक म्हस्के, मच्छिंद्र बनकर आदींनी अग्निशमन यंत्राचा वापर करून आग आटोक्यात आणली. येथील अग्निशमन यंत्रणा कालबाह्य झाली आहे, तरीही छोटीशी आग विझवण्यासाठी उपयोगात आली. आग भडकली असती तर ही यंत्रणा यावेळी कुचकामी ठरली असती. 

Tags : Aurangabad, Burning, fire, Diesel, bus,  refueling