Tue, Nov 13, 2018 04:40होमपेज › Aurangabad › विनयभंगाचे कारण..फक्त एक कोंबडी

विनयभंगाचे कारण..फक्त एक कोंबडी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी 

पाळलेली कोंबडी विकत दिली नाही म्हणून एका 35 वर्षीय महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना तालुक्यातील सोलनापूर येथे घडली. या प्रकरणी पैठण पोलिसांनी 26 वर्षीय तरुणाला गजाआड केले आहे. बुधवारी त्यास पैठण  येथील न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी हसूर्ल कारागृहात करण्यात आली. 

मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास  आरोपी सचिन रतन खडसन (रा. राहुलनगर) हा फिर्यादी महिलेच्या सोलनापूर येथील घरी गेला. तुझी  कोंबडी मला विकत दे असा तो म्हणाला. महिलेने कोंबडी विकण्यास नकार दिल्याने संतापलेल्या सचिनने या महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी सचिन खडसन विरोधात मंगळवारी  गुन्हा दाखल  करण्यात आला. त्यास अटक करण्यातआली. बुधवारी न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली आहे. 
 

Tasgs : Women, Boy, Harassment, Aurangbad, Sale, Hen, FIR, Police 


  •